चर्चेत येण्यासाठी आमिषाचा हॉट फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2016 17:10 IST
आमिषा पटेल ही मागील मोठ्या कालावधीपासून कोणत्याच चित्रपटात नाही. त्यामुळे तिच्या नावाची इंडस्ट्रिमध्ये आजघडीला कोणतीच चर्चा नाही. आपण चर्चेत ...
चर्चेत येण्यासाठी आमिषाचा हॉट फोटो
आमिषा पटेल ही मागील मोठ्या कालावधीपासून कोणत्याच चित्रपटात नाही. त्यामुळे तिच्या नावाची इंडस्ट्रिमध्ये आजघडीला कोणतीच चर्चा नाही. आपण चर्चेत यावे, याकरिता तिने वेगळीच शक्कल लढवून, ट्विटरवर एक हॉट फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये तिने काळे स्विमसूट, चेन व काळा चष्मा परिधान केलेला असून,ती शॉवर खाली दिसत आहे.ट्विट करतानातेही तिने चूक केली . ‘शॉवर लाइक ए रॉकस्टार’ असे तिला लिहायचे होते. परंतु, तिने त्याऐवजी ‘शॉवर लाइक ए टॉकस्टार’ असे लिहीले. लोकांनी तिच्या या हॉट फोटोचे कौतुक केले. परंतु, या चुकीमुळे तिच्या टिकेचा भडीमार उठवला. काळा चष्मा परिधान करुन तिने ट्विट केले खरे! मात्र चुकी करुन बसली.