वडिल-बहिण रणदीपला भेटायला हॉस्पिटलमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2016 11:42 IST
फिल्म अॅक्टरची ग्लॅमरस जीवन पाहून कोणालाही हेवा वाटेल. परंतु चंदेरी दुनियेत त्यांना भोगावा लागणारा त्रास सामान्य जनतेसमोर क्वचितच येतो. ...
वडिल-बहिण रणदीपला भेटायला हॉस्पिटलमध्ये
फिल्म अॅक्टरची ग्लॅमरस जीवन पाहून कोणालाही हेवा वाटेल. परंतु चंदेरी दुनियेत त्यांना भोगावा लागणारा त्रास सामान्य जनतेसमोर क्वचितच येतो. आता रणदीप हुडाचेच उदाहरण घ्या ना.पोटाच्या आजाराने हैराण रणदीपला आराम करण्यासाठीसुद्धा वेळ नाही. शुटिंग, प्रोमोशन, इव्हेंट्स अशा फेरीमध्ये अडकलेला. रणदीप ‘सुलतान’ चित्रपटाच्या सेटवर बेशुद्ध पडला.अॅपेंडिक्सचा त्रास असुनही तो शुटिंग करत होता. वेदना शामक औषधे घेऊन तो सर्व प्रोफेशनल जबाबदाऱ्या पार पाडत होता. ‘सुलतान’ची शुटिंग, ‘लाल रंग’, ‘सरबजीत’चे प्रोमोशन यामध्ये त्याची चांगलीच ओढताण होत होती. नुकतेच त्याने मुंबईमध्ये अग्निशामक दलाच्या एका कार्यक्रमाला हजेरीसुद्धा लावली.सलमानच्या लक्षात आल्यावर त्याने रणदीपला हॉस्पिटलमध्ये भरती होण्याचा सल्ला दिला. आॅपरेशन झाल्यानंतर आता त्याची तब्येत ठिक असून त्याला भेटायला त्याचे वडिल आणि बहिण गेले. कामाच्या जागी काम ठिक आहे परंतु रणदीप तब्येतही तेवढीच महत्त्वाची आहे.