Join us

​हॉरर!! ‘सांसें : दी लास्ट ब्रीथ’चा ट्रेलर आला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2016 18:04 IST

रजनीश दुग्गल आणि सोनारिका भदौरिया यांची मुख्य भूमिका असलेला ‘सांसें : दी लास्ट ब्रीथ’ या चित्रपटाचा ट्रेलर आज गुरुवारी रिलीज झाला.

रजनीश दुग्गल आणि सोनारिका भदौरिया यांची मुख्य भूमिका असलेला ‘सांसें : दी लास्ट ब्रीथ’ या चित्रपटाचा ट्रेलर आज गुरुवारी रिलीज झाला. याचे वैशिष्ट्य म्हणजे, या ट्रेलरमध्ये टायटल ट्रॅकचीही झलक पाहायला मिळतेय. या हॉरर चित्रपटाच्या शूटींगदरम्यान अनेकदा अख्ख्या टीमची भीतीने गाळण उडाली. आता तुम्ही म्हणाल हे कसे? तर चित्रपटातील काही दृश्ये जिवंत वाटावीत, यासाठी स्टारकास्टने भूत आणि आत्म्यांशी बोलण्याचा दावा करणाºया अनेकांशी चर्चा केली. त्यांचे अनुभव जाणून घेतले. भीतीने कापरे भरावे, अशा काही ठिकाणी चित्रपटाचे शूटींग झाले. राजीव एस रूइया दिग्दर्शित या चित्रपटात रजनीश व सोनारिका यांच्याशिवाय नीता शेट्टी आणि हितेन तेजवानी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तेव्हा बघूयात तर ‘सांसें : दी लास्ट ब्रीथ’ ट्रेलर!!