Join us
Daily Top 2Weekly Top 5

हनीप्रितच्या आईने राखी सावंतवर केला पाच कोटींचा अबु्रनुकसानीचा दावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2018 18:04 IST

आयटम गर्ल राखी सावंत पुन्हा एकदा कायद्याच्या कचाट्यात अडकताना दिसत आहे. होय, रिअल लाइफ हनीप्रितच्या आईने तिच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ...

आयटम गर्ल राखी सावंत पुन्हा एकदा कायद्याच्या कचाट्यात अडकताना दिसत आहे. होय, रिअल लाइफ हनीप्रितच्या आईने तिच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करणारी नोटीस पाठविली आहे. सध्या राखी सावंत बाबा राम रहीमवर बनत असलेल्या एका चित्रपटात हनीप्रितची भूमिका साकारत आहे. याच कारणामुळे हनीप्रितची आई आशा तनेजा यांनी अ‍ॅड. मोमिन मलिक यांच्या माध्यमातून राखीला पाच कोटी रुपयांची अब्रुनुकसानीचा दावा करणारी नोटीस पाठविली आहे. तसेच बलात्काराच्या आरोपात शिक्षा भोगत असलेल्या राम रहीम आणि त्याची मानलेली मुलगी हनीप्रित यांच्या नात्याविषयी राखी सावंतने केलेले वक्तव्य मागे घेण्यास सांगितले आहे. अ‍ॅड. मोमिन मलिकने दिलेल्या माहितीनुसार, जर राखी सावंतने तिने केलेले वक्तव्य मागे घेतले नाही तर तिच्यावर आम्ही पाच कोटी रूपयांच्या अब्रुनुकसानीचा खटला चालविणार आहोत. यावेळी आशा तनेजाने आरोप लावले की, राम रहीमसोबत हनीप्रितचे नाव जोडून राखी सावंतने तिची बदनामी केली आहे. राम रहीम सध्या कारागृहात असून, त्याला २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. राम रहीमला पंचकुला न्यायालयाने बलात्काराच्या आरोपात दोषी ठरवित ही शिक्षा सुनावली. दरम्यान, राखी सावंतने दावा केला की, ती राम रहीमला बºयाचदा भेटली आहे, तसेच राम रहीम माझ्याकडे आकर्षित असल्याने, हनीप्रित माझा तिरस्कार करायची, असेही राखीने म्हटले होते. रिपोर्टनुसार राखी सावंतने म्हटले होते की, हनीप्रितने मला राम रहीमपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान, राखी सावंत राम रहीमच्या या वादग्रस्त जीवनावर आधारित चित्रपटात हनीप्रितची भूमिका साकारत आहे. सध्या या चित्रपटाची शूटिंग सुरू असून, लवकरच राखी हनीप्रित आणि राम रहीमच्या नात्याची पोलखोल करणार आहे.