Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘जोरावर’ मध्ये हनी सिंगचा अ‍ॅक्शन लुक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 04:49 IST

 रॅपर-सिंगर यो यो हनी सिंग याने त्याच्या चाहत्यांसाठी एक नवं गिफ्ट आणलं आहे.

 रॅपर-सिंगर यो यो हनी सिंग याने त्याच्या चाहत्यांसाठी एक नवं गिफ्ट आणलं आहे. आता तो केवळ एक गायक म्हणून दिसणार नाही तर एक अ‍ॅक्शन हिरो म्हणून पण दिसणार आहे.तो आगामी पंजाबी चित्रपट ‘जोरावर’ मधून सिल्व्हर स्क्रिनवर पदार्पण करत आहे. ३२ वर्षीय हनी सिंग ‘सुपरमॅन’ च्या रूपात चित्रपटाच्या टिजरमध्ये हा अ‍ॅक्शन अ‍ॅक्ट सादर करत आहे. तो म्हणतो,‘ अ‍ॅक्शन आधारित चित्रपटात मी देखील पहिल्यांदाच अभिनय साकारतोय. तर मला चांगले वाटतेय. पीटीसीच्या या अभिनव प्रोजेक्टचे मी आभार मानतो. ’यात हनी सिंग स्वत:च्या गाण्यासोबतच स्वत:लाही थोडंसं प्रमोट करत असल्यासारखे वाटते. दिग्दर्शक विनील मार्कन म्हणतो की, हनी सिंग सोबत काम केल्याने खुप चांगला अनुभव आला.