Join us

हनी इराणी यांना आता ओळखणे देखील जातंय कठीण, त्या झाल्यात प्रचंड अशक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 14:47 IST

हनी इराणी प्रचंड अशक्त झाल्या असल्याचे यावेळी दिसून आले.

ठळक मुद्देहनी इराणी प्रचंड अशक्त झाल्या असल्याचे यावेळी दिसून आले. त्यांची मुलगी झोया आणि फरहान यांचा हात पकडून त्या चालताना दिसल्या.

हनी इराणी यांनी बालकलाकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी आजवर त्यांच्या कारकिर्दीत एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्या बॉलिवूडपासून दूर आहेत. त्यांचा नुकताच एक फोटो समोर आला असून या फोटोत त्यांना ओळखणे देखील कठीण जात आहे. हनी इराणी यांना नुकतेच त्यांचा मुलगा फरहान अख्तर, झोया अख्तर, शिबानी दांडेकर, फरहानच्या मुली, जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्यासोबत वांद्रे येथील एका हॉटेलच्या बाहेर पाहाण्यात आले. 

हनी इराणी प्रचंड अशक्त झाल्या असल्याचे यावेळी दिसून आले. त्यांची मुलगी झोया आणि फरहान यांचा हात पकडून त्या चालताना दिसल्या. हनी इराणी या प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नी आहेत. 

शबाना यांच्यासोबत लग्न करण्याआधी अभिनेत्री हनी इराणी यांच्यासोबत जावेद यांचे लग्न झाले होते. हनी आणि जावेद यांचा प्रेमविवाह होता. ‘सीता और गीता’ या चित्रपटाच्या सेटवर हनी आणि जावेद यांची ओळख झाली होती. काहीच दिवसांत त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

पुढे जावेद यांच्या आयुष्यात शबाना आझमी आल्या. शबाना आणि जावेद यांची ओळख झाली, त्यावेळी त्यांचे हनी यांच्यासोबत लग्न झाले होते. जावेद यांचे लग्न झाले असल्यामुळे शबाना त्यांच्यापासून दूरच राहायची. पण एका पार्टीत शबानाच्या ‘स्पर्श’ या चित्रपटातील भूमिकेचे त्यांनी कौतुक केले आणि त्या दिवसापासून त्यांच्यात संभाषणाला सुरुवात झाली. काहीच काळात ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. हनी यांच्या कानावर ही गोष्ट पोहोचताच घरात रोज भांडणे व्हायला लागली. पण जावेद आता आपल्यावर प्रेम करत नाहीत याची हनी यांना जाणीव झाल्याने त्यांनी जावेद यांना शबानाकडे जायला सांगितले. लग्नाच्या सातच वर्षांत हनी आणि जावेद यांनी घटस्फोट घेतला. हनीसोबत घटस्फोट झाल्यानंतर वर्षभरातच जावेद आणि शबाना यांनी लग्न केले.

टॅग्स :फरहान अख्तरजावेद अख्तर