Join us

​हनी व बादशाह यांच्यात हाणामारी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2016 17:40 IST

सुप्रसिद्ध रॅपर हनी सिंह व बादशाह यांच्यात शाब्दिक लढाई सुरु आहेच. काही दिवसांपूर्वी हनी सिंह याने रॅपर बादशहाची तुलना ...

सुप्रसिद्ध रॅपर हनी सिंह व बादशाह यांच्यात शाब्दिक लढाई सुरु आहेच. काही दिवसांपूर्वी हनी सिंह याने रॅपर बादशहाची तुलना ‘नॅनो’शी केली होती. यावर बादशहानेही हनीला सडेतोड उत्तर दिले होते. या शाब्दिक युद्धापूर्वी दोघांमध्ये जोरदार भांडण झाल्याचे आता समोर आले आहे. ताज्या बातमीनुसार, दिल्लीत एक प्रायव्हेट पार्टी होती. या पार्टीत हनी व बादशहा समोरासमोर आले. कुठल्याशा कारणावरून त्यांच्या वाद झाला. यादरम्यान दोघांनीही एकमेकांना टोमणे मारणे सुरु केले. शब्दावरून शब्द वाढत गेला आणि गोष्ट धक्काबुक्कीपर्यंत पोहोचली. पार्टीतील अन्य लोकांनी कसेबसे दोघांनाही आवरले. अर्थात हनीसिंहच्या प्रवक्त्याने असे काही घडल्याचा इन्कार केला आहे. हनी सिंह मुंबई व दुबईतील शोमध्ये व्यस्त आहे.तो कुठल्याही पार्टीला गेला नव्हता, असे या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे. खरे काय, ते हनी व बादशहाच जाणोत!!!