Join us

होम स्वीट होम! अंकिता लोखंडे आणि विकी जैनला नव्या घरात झालं १ वर्ष पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 19:46 IST

अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने तिच्या या खास घरातलं एक वर्ष साजर केले. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. जी चर्चेत आली आहे.

घर ही सगळ्यांसाठी खास जागा असते. प्रत्येकाला त्यांचे घर हे तितकेच खास असते. त्या फक्त चार भिंती नसून अनेक भावना आणि माणसाची लगबग असलेली ही खास जागा असते. नुकतेच अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने तिच्या या खास घरातलं एक वर्ष साजर केले. अंकिताने सोशल मीडियावर फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. जी चर्चेत आली आहे.

अंकिता लोखंडे हिने तिच्या सोशल मीडियावर तिच्या नवऱ्यासोबत फोटो शेअर केला आणि खास कॅप्शन दिले, आमच्या आनंदी जागेमधले खास एक वर्ष ! वेळ हा अगदीच पटकन निघून जातो. मला अजूनही आठवतंय  जेव्हा तू आमच्यासाठी हे घर विकत घेतलंस तेव्हा तू किती उत्साही आणि आनंदी होतास कारण हे आमचे मुंबईतील पहिले घर होते. शेवटी ज्या दिवशी आम्ही शिफ्ट झालो आहाहा!! किती सुंदर आणि संस्मरणीय होता तो दिवस. ते १०-०६-२२ होते आणि काल आम्ही आमच्या आनंदी जागेचे एक वर्ष पूर्ण केले. संपूर्ण वर्ष !!! खूप भावना आणि खूप सुंदर भावना आणि खूप प्रेम आणि आठवणी असलेला हा रोलर कोस्टर आहे.. जेव्हा मी आमचे घर पाहते तेव्हा मला खूप कृतज्ञ वाटते... म्हणून धन्यवाद मला आमचे घर दिल्याबद्दल ज्याला आम्ही आमचे आनंदी ठिकाण म्हणतो ! प्रिय घर

आगामी वर्षांसाठी उत्सुक आहे...ती पुढे म्हणते की, आम्ही इथे शिफ्ट होऊन एक वर्ष झाले आहे यावर माझा विश्वास बसत नाही. हे घर आमच्यासाठी भाग्यवान आहे. आम्ही येथे अशा सुंदर आठवणी बनवल्या आहेत आणि येणाऱ्या वर्षा साठी मी उत्सुक आहे.  तिचा पती विकी जैन यानेही सांगितले, मला अंकिताला स्वतःचे घर द्यायचे होते. गेल्या वर्षभरात तिने हे घर आपलंस घर केलं आहे. हे आपले छोटेसे जग आहे, आपला स्वर्ग आहे.

अंकिता रणदीप हुड्डासोबत स्वातंत्र्य  वीर सावरकर हा चित्रपट करत आहे. ज्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. तिचे चाहते तिला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

टॅग्स :अंकिता लोखंडे