दरम्यान, अमांदाने ‘एअरप्लेन मोड’, ‘डिपोर्र्टेड’, ‘द बेट’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर वरुण सध्या त्याच्या आगामी ‘सुई-धागा’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटात वरुण धवनसोबत अभिनेत्री अनुष्का शर्मा हीदेखील बघावयास मिळणार आहे. नुकताच या चित्रपटातील वरुण आणि अनुष्काचा लूक समोर आला असून, त्यामध्ये ते खूपच सिम्पल अंदाजात बघावयास मिळत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार वरुण या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. त्याला चित्रपटात कुठलीच कसर सोडायची नाही. वरुणने मध्य प्रदेशातील चंदेरी येथे जवळपास दहा तास अतिशय गर्मीत सायकल चालविली. याच सीन्सचे वरुण आणि अनुष्काचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.}}}} ">So... @Varun_dvn when are we doing my first bollywood Movie together?— Amanda Cerny (@AmandaCerny) March 6, 2018
हॉलिवूड अभिनेत्रीने विचारले, ‘आपण एकत्र चित्रपट केव्हा करणार?’ वरुण धवनने दिले मजेशीर उत्तर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2018 18:35 IST
अभिनेता वरुण धवन सध्या त्याच्या आगामी ‘सुई-धागा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटात वरुण एका टेलरची भूमिका साकारत आहे. निर्माता ...
हॉलिवूड अभिनेत्रीने विचारले, ‘आपण एकत्र चित्रपट केव्हा करणार?’ वरुण धवनने दिले मजेशीर उत्तर!
अभिनेता वरुण धवन सध्या त्याच्या आगामी ‘सुई-धागा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटात वरुण एका टेलरची भूमिका साकारत आहे. निर्माता करण जोहर याच्या ‘स्टूडेंट आॅफ द ईयर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणाºया वरुणने अल्पकाळातच इंडस्ट्रीत स्वत:चे स्थान निर्माण केले. त्यामुळेच आज त्याच्यासोबत काम करण्यासाठी इंडस्ट्रीतील प्रत्येकजण उत्सुक आहे. केवळ बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडमधील एक अभिनेत्री वरुणसोबत काम करू इच्छिते. होय, नुकतेच हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अमांदा सरनी हिने वरुणसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. अमांदाने तिच्या आॅफिशियल ट्विटर अकाउंटवर वरुण धवनला टॅग करताना हा प्रश्न विचारला की, तू माझ्यासोबत केव्हा चित्रपट करणार आहेस? अमांदाच्या या ट्विटला वरुणनेही मजेशीर अंदाजातच उत्तर दिले. हॉलिवूड अभिनेत्री अमांदाच्या ट्विटला उत्तर देताना वरुणने लिहिले की, ‘हो हो लवकरच, माझ्याकडे एक प्लॅनसुद्धा आहे. परंतु तुझे चाहते तुला खूप पसंत करतात.’ अमांदाच्या ट्विटनंतर तिच्या चाहत्यांनी कॉमेण्ट बॉक्समध्ये प्रतिक्रियांचा अक्षरश: पाऊस पाडला. एका यूजरने लिहिले की, ‘अमांदा आता बॉलिवूड चित्रपट करणार आहे, त्यामुळे तिचा हा चित्रपट नक्कीच सुपरहिट ठरेल.’ आणखी एका यूजरने लिहिले की, ‘अमांदा तू खरोखरच लकी आहेस की, वरुण धवनसोबत तुला काम करण्याची संधी मिळाली. कारण त्याच्या पुस्तकात कोणी पास/नापास होत नाही. तो एक लकी चार्म आहे.’