Join us

​Holi Songs: बॉलिवूडच्या ‘या’ गाण्यांशिवाय अधुरी ठरेल तुमची होळी...!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2017 11:39 IST

होळी आणि बॉलिवूड यांचे एक वेगळे कनेक्शन आहे. होळी म्हणजे आनंदाचा उत्साहाचा सण. रंगांची मनोसोक्त उधळण करणाºया या सणाचे सेलिब्रेशन असेल आणि बॉलिवूडची गाणी नसतील, असे शक्यच नाही. गेली अनेक वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अनेक होळीची गाणी आहेत. अशीच काही होळीची खास गाणी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत...ऐका तर....

होळी आणि बॉलिवूड यांचे एक वेगळे कनेक्शन आहे.  होळी म्हणजे आनंदाचा उत्साहाचा सण. रंगांची मनोसोक्त उधळण करणाºया या सणाचे सेलिब्रेशन असेल आणि बॉलिवूडची गाणी नसतील, असे शक्यच नाही. गेली अनेक वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अनेक होळीची गाणी आहेत. अशीच काही होळीची खास गाणी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत...ऐका तर.... अरे जा रे नटखट...ग्रेट क्लासिक म्हणून ओळखल्या जाणाºया या गाण्याशिवाय होळी सेलिब्रेशन अशक्यच. १९५९ साली प्रदर्शित झालेल्या व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘नवरंग’ या सिनेमातील महिपाल आणि संध्या यांनी जिवंत केलेले हे गाणे म्हणजे एक अल्टीमेट होली साँग. ऐका तर... जोगी जी धीरे धीरे...‘नदिया के पार’ या सचिन आणि साधना सिंह यांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटातील ‘जोगी जी धीरे धीरे...’ हे गाणे म्हणजे, एक सदाबहार होळी गीत. जसपाल सिंह आणि हेमलता यांच्या आवाजातील हे गाणे म्हणजे, होळीच्या रंगांसोबत हळूहळू चढत जाणारी नशा आहे. होली आई रे... ‘मदर इंडिया’ या सिनेमातील ‘होली आई रे...’ म्हणजे होळीचा आनंद द्विगुणीत करणारे गाणे. शमशेद बेगम यांनी गायलेल्या या गाण्यातून  होळीच्या सणाचे महत्त्व अधोरेखित होते. बॉलिवूडला चार चाँद लावणाºया १९५७ साली झळकलेल्या या सिनेमात नर्गिस, राजेंद्र कुमार, सुनिल दत्त आणि राजकुमार, मेहबुब खान यांनी भूमिका साकारल्या होत्या. आज ना छोडेंगे...१९७० साली प्रदर्शित  झालेल्या‘कटी पतंग’ या या सिनेमातील हे एक गाजलेलं गाणं. किशोर कुमार यांच्या आवाजातील हे गाणं आजही तितकंच तरुण आहे.  होळी आहे आणि हे गाणं ऐकायला मिळालं नाही असं होणं शक्यच नाही. राजेश खन्ना आणि आशा पारेख यांच्यावर चित्रीत झालेलं हे  एक एव्हरग्रीन गाणं तुम्ही ऐकायलाच हवे...होली के दिन... ‘शोले’ या चित्रपटातील ‘होली के दिन...’ हे गाणे म्हणजे, रंगांमध्ये न्हाऊन निघालेल्या प्रेमींच्या मनातील नेमक्या भावना. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील या गाण्यात धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांनी या गाण्यात जान टाकली. रंग बरसे... ‘सिलसिला’ या अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या अभिनयाने सजलेल्या लोकप्रीय चित्रपटातील हे गाणे आजही सगळ्यांच्या ओठांवर आहे. हरिवंशराय बच्चन यांच्या अगणित गाण्यांकीच एक असलेल्या या गाण्याला आवाज दिला होता त्यांचाच मुलाने म्हणजे, खुद्द अमिताभ यांनी.  प्रेमात आकंठ बुडालेल्या जीवांचे रंग या गाण्यातून आजही उठून दिसतात. शिव हरी यांनी या गाण्याला संगीत दिलं होतं. अंग से अंग लगाना... होळीच्या सणावरच बेतलेलं हे ‘डर’ या सिनेमातील आणखी एक गाणं. जुही चावला आणि सनी देओलवर चित्रीत झालेलं हे गाण सुरु झालं की पाऊल आपोआप थिरकायला लागतात. हरिप्रसाद चौरसिया आणि शिव कुमार यांनी हे गाणं संगीतबद्ध केलंय. होली खेले रघुवीरा... अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील हे आणखी एक होळीवरचे सदाबहार गीत.  अलका याग्निक, सुखविंदर सिंग आणि उदीत नारायण यांचाही आवाज या गाण्यात ऐकायला मिळतो. ‘बागबान’ या सिनेमातील हे गाणे तुम्ही ऐकावे असेच.बलम पिचकारी‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटातील ‘बलम पिचकारी’ हे गाणे म्हणजे दीपिका पादुकोण व रणबीर कपूरची मजेदार केमिस्ट्री आणि होळीची जबदरस्त मस्ती याचे एक धम्माल कॉम्बिनेशन. होळीच्या दिवशी हे गाणे मिस करणे जमायचेच नाही.