Join us

​श्रद्धाचा हॉली डे प्लान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2016 20:59 IST

‘हाफ गर्लफ्रेन्ड’चे न्यूयॉर्कमधील शूटींग शेड्यूल संपवून श्रद्धा कपूर कालच मुंबईत परतली. गेल्या काही महिन्यांपासून श्रद्धा कमालीची बिझी आहे. तिकडे ...

‘हाफ गर्लफ्रेन्ड’चे न्यूयॉर्कमधील शूटींग शेड्यूल संपवून श्रद्धा कपूर कालच मुंबईत परतली. गेल्या काही महिन्यांपासून श्रद्धा कमालीची बिझी आहे. तिकडे तिचे डिअर डॅड शक्ती कपूर हे शूटींगमध्ये आणि भाऊ सिद्धार्थ हा  ‘हसीना पारकर’च्या बायोपिकच्या तयारीत व्यक्त आहे. (या बायोपिकमध्ये सिद्धार्थ दाऊद इब्राहिमची भूमिका साकारणार आहे. ) उरली मम्मी शिवांगी तर ती या तिघांची काळजी घेण्यात गुंतली आहे. एकंदर काय तर कपूर फॅमिलीला सध्या एकमेकांसोबत वेळ घालवणे कठीण झाले आहे. पण आता या बिझी शेड्यूलमधून काही वेळ काढून फॅमिलीसोबत मस्त एन्जॉय करण्याचा श्रद्धाचा प्लान आहे. होय, श्रद्धाची बेस्ट फ्रेन्ड इशांका वाही हिचा येत्या ८ ते १० तारखेदरम्यान दुबईत विवाह सोहळा आहे. या लग्नाच्या निमित्ताने का होईना, कामातून सुटी घेऊन मस्तपैकी एन्जॉय करण्याची कपूर फॅमिलची योजना आहे. म्हणजे काय तर लग्न तर लग्न आणि मज्जा ती मज्जा. आहे ना कपूर फॅमिली हुशार!!