हिमेश म्हणतो, मला नाचायचयं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2016 04:57 IST
गायक, संगीतकार आणि अभिनेता असा एक एक टप्पा गाठणाºया हिमेश रेशमियाला आता चांगला डान्सर बनण्याचे वेध लागले आहेत. मी ...
हिमेश म्हणतो, मला नाचायचयं!
गायक, संगीतकार आणि अभिनेता असा एक एक टप्पा गाठणाºया हिमेश रेशमियाला आता चांगला डान्सर बनण्याचे वेध लागले आहेत. मी चांगला डान्सर नाही, हे हिमेशने स्वत:च कबुल केले आहे. मी चांगला डान्सर नाही. पण मला चांगले डान्सर बनायचे आहे आणि यासाठी मी कठीण मेहनत घ्यायला तयार आहे, असे हिमेश सांगत सुटलाय. हिमेशने ‘आप का सुरूर’,‘कर्ज’, ‘दी एक्सपोज’ या सारख्या चित्रपटांत गंभीर भूमिका साकारली आहे. यावर हिमेश म्हणतो, खºयाखुºया आयुष्यात मी काहीसा गंभीर आहे. पण लोक मला समजतात मी तितकाही गंभीर नाही. भविष्यात विनोदी आणि हलक्या फुलक्या भूमिका साकारण्याचा मी प्रयत्न करेल. आता हिमेशने इतकेच मनावर घेतले म्हटल्यावर, आपण त्याला शुभेच्छा देऊ यात. काय? हो ना?