Join us
Daily Top 2Weekly Top 5

राजेश खन्ना की अमिताभ बच्चन? 80 च्या दशकात सर्वाधिक मानधन कोण घ्यायचं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 12:26 IST

Bollywood actors: त्याकाळी बिग बी आणि राजेश खन्ना हे दोन्ही कलाकार टॉपचे अभिनेता होते.

शाहरुख खान, सलमान खान यांसारखे सुपरस्टार आजच्या घडीला एका सिनेमासाठी १५० ते २५० कोटी रुपये चार्ज करतात. तर बिग बी अर्थात अमिताभ बच्चन सुद्धा एका टीव्ही शो साठी कोटयवधी रुपये चार्ज करतात. विशेष म्हणजे आजच्या घडीला या कलाकारांच्या मानधनाचा आकडा हा प्रचंड मोठा आहे. परंतु, 80 च्या दशकात सर्वाधिक मानधन कोणता कलाकार घ्यायचं हे माहितीये का तुम्हाला?

80 च्या दशकात अमिताभ बच्चन (amitabh bachchan), राजेश खन्ना (rajesh khanna),शत्रुघ्न सिन्हा  यांसारख्या सुपरस्टार्सने इंडस्ट्री गाजवली होती. त्यामुळे या कलाकारांना आपल्या सिनेमात घेण्यासाठी प्रत्येक दिग्दर्शक, निर्माते उत्सुक असायचे. विशेष म्हणजे त्याकाळी बिग बी आणि राजेश खन्ना हे दोन्ही कलाकार टॉपचे अभिनेता होते. त्यामुळे त्यांच्यात मानधनाच्या बाबतीत कायम चढाओढ असायची. मात्र, या दोघांमध्ये जास्त मानधन कोण घ्यायचे हे आज पाहुयात.

 

1980 च्या दशकात अमिताभ बच्चन हे सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार होते. विशेष म्हणजे त्यावेळी राजेश खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हा हे दोन्ही कलाकार कमी मानधन घ्यायचे. मात्र, हे दोन्ही कलाकार कमी मानधन घेऊन सुद्धा त्यांचं नाव टॉप कलाकारांच्या यादीत घेतलं जायचं.

1979-80 च्या दशकात अमिताभ बच्चन एका सिनेमासाठी 20 लाख रुपये मानधन घ्यायचे. तर, बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार अर्थात राजेश  12 लाख फी घ्यायचे. त्यांच्या खालोखाल शत्रुघ्न सिन्हा 10 लाख रुपये एका सिनेमासाठी घ्यायचे.   दरम्यान, या कलाकारांनंतर ऋषी कपूर, हेमा मालिनी हे कलाकार 10 लाख रुपये फी घ्यायचे. अमिताभ यांनी त्यांचं मानधन 1990 पर्यंत दुपट्टीने वाढवलं होतं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rajesh Khanna or Amitabh Bachchan: Who earned more in the 80s?

Web Summary : In the 80s, Amitabh Bachchan was the highest-paid actor, charging ₹20 lakh per film. Rajesh Khanna earned ₹12 lakh, followed by Shatrughan Sinha at ₹10 lakh. Bachchan doubled his fees by 1990.
टॅग्स :बॉलिवूडअमिताभ बच्चनराजेश खन्नासेलिब्रिटी