Join us

‘ग्रेट ग्रँड मस्ती’साठी उर्वशीला सर्वाधिक फी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2016 18:50 IST

उर्वशी रौतेला ही बी-टाऊनमधील एक हॉटेस्ट अभिनेत्री आहे. सनी देओलच्या ‘सिंग साहब दी ग्रेट’ या चित्रपटातून उर्वशीने बॉलिवूड डेब्यू ...

उर्वशी रौतेला ही बी-टाऊनमधील एक हॉटेस्ट अभिनेत्री आहे. सनी देओलच्या ‘सिंग साहब दी ग्रेट’ या चित्रपटातून उर्वशीने बॉलिवूड डेब्यू केले होते. यानंतर ‘भाग जॉनी’, ‘सनम रे’ या चित्रपटांमध्ये उर्वशी दिसली आणि यावर्षी ‘ ग्रेट ग्रँड मस्ती’मध्ये उर्वशी सेक्सी अवतारात चाहत्यांसमोर आली. काही दिवसांपूर्वी अ‍ॅडल्ट कॉमेडी  असलेला‘ ग्रेट ग्रँड मस्ती’ रिलीज झाला. अर्थात बॉक्सआॅफिसवर हा चित्रपट प्रेक्षकांनी  नाकारला. कदाचित रिलीज व्हायच्या दोन आठवड्यांपूर्वीच चित्रपट आॅनलाईन लीक झाल्यानेही बॉक्सआॅफिसवर ‘ ग्रेट ग्रँड मस्ती’ फारशी चमक दाखवू शकला नाही. पण उर्वशी  मात्र या चित्रपटात चांगलीच चमकली. हॉट वर्जिन घोस्ट बनलेली उर्वशी प्रेक्षकांना चांगलीच आवडली. त्यामुळेच‘ ग्रेट ग्रँड मस्ती’चे दिग्दर्शक इंद्रकुमार खूश आहे. किमान उर्वशीची या चित्रपटासाठी केलेली निवड चुकलेली नाही, याचे त्यांना समाधान आहे. कारण उर्वशीला या चित्रपटात अन्य अभिनेत्रींच्या तुलनेत सर्वाधिक फी दिली गेली होती. एका सूत्राचे मानाल तर, उर्वशी पहिल्यांदाच सेक्स कॉमेडी करणार होती. त्यामुळे ती थोडी साशंकही होती. तिचे मन वळवायला  इंद्रकुमार यांना बरेच पापड बेलावे लागले. खास उर्वशीसाठी चित्रपटात काही बदल करण्यात आले होते, असेही कळते..