Join us

'हेस्ट स्टोरी 3'ला सलमानमुळे होकार - डेझी'...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 11:01 IST

'हेट स्टोरी 3' मध्ये डेझी शाह ही बोल्ड अवतारात दिसणार आहे. डेझी म्हणते की,' तिने या चित्रपटाला होकार दिला ...

'हेट स्टोरी 3' मध्ये डेझी शाह ही बोल्ड अवतारात दिसणार आहे. डेझी म्हणते की,' तिने या चित्रपटाला होकार दिला कारण सलमान खानने तिला यासाठी तयार केले आहे. काहीतरी वेगळे करायला मिळेल याविचाराने सलमानने तिला हा चित्रपट करण्यास सांगितले आहे. २0१४ मध्ये 'जय हो ' चित्रपटांत तिने सलमानसोबत काम केले आहे. ती म्हणते की,' मी नेहमी नवीन चित्रपटासाठी मागे सरकते. पण, तो मला नेहमी समोर उभे करतो. हा चित्रपट जय होच्या एकदम विरूद्ध असल्याने त्याने हा चित्रपट करण्यास मला सांगितले आहे.' यात शर्मन जोशी, करण सिंग ग्रोव्हर, जरिन खान असणार आहेत. ती म्हणते,' एक अभिनेत्री म्हणून मला प्रत्येक भूमिका करता यायला हव्यात. त्यामुळे मी स्वत:ला पुढे सरकावले आहे. मला वाटलं की,' हा झोन सेफ नाही. पण मी प्रयत्न केला आहे. जरीनने दबंगस्टार सलमानसोबत 'वीर' चित्रपटात काम केले आहे. '