खलनायकाच्या भूमिकेत नायकांचे कमबॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 14:46 IST
खलनायकाच्या भूमिकेत पुनरागमनासाठी सध्याचे स्टार खूप उत्साहित दिसून येत आहेत. प्रथम नायक आणि नंतर खलनायक बनणार्यांची यादी खूप मोठी आहे, ...
खलनायकाच्या भूमिकेत नायकांचे कमबॅक
खलनायकाच्या भूमिकेत पुनरागमनासाठी सध्याचे स्टार खूप उत्साहित दिसून येत आहेत. प्रथम नायक आणि नंतर खलनायक बनणार्यांची यादी खूप मोठी आहे, ज्यामध्ये शत्रुघ्न सिन्हापासून विनोद खन्नापर्यंत अनेक कलाकारांची नावे आहेत. अक्षय खन्ना अक्षय खन्ना अनेक दिवसांपासून रूपेरी पडद्यावरून गायबच होता. त्याचा शेवटचा चित्रपट गली गली में शोर है प्रदर्शित झाला होता, जो बॉक्स आॅफिसवर सुपर फ्लॉप ठरला. आता ज्युनियर खन्ना पुनगरागमन करीत आहे. विशेष म्हणजे, त्याचे हे कमबॅक खलनायकाच्या भूमिकेत आहे. अब्बास मस्तान यांच्या हमराज चित्रपटातही त्याने खलनायक साकारला होता तर रेस मध्येदेखील त्याची नकारात्मक भूमिका होती. हा योगायोग आहे की, त्याचे वडील विनोद खन्ना यांच्याप्रमाणेच अक्षय खन्नासुद्धा प्रथम नायक आणि नंतर खलनायकाच्या भूमिकेत पसंतीला उतरला. आपल्या दुसर्या पारीत अमिताभ बच्चन यांनीदेखील विपुल शाह यांच्या आंखेमध्ये खलनायकाची भूमिका केली आणि वाह वाह मिळविली. विवेक ओबेराय नुकताच राकेश रोशन यांच्या क्रीश-३ या चित्रपटात विवेक ओबेराय खलनायक झाला होता. हा चित्रपट सुपर हिट झाला, मात्र विवेकला एवढी प्रशंसा मिळाली नाही, जितकी त्याला अपेक्षा होती. मात्र सर्वांसोबत असे होत नाही.अक्षय कुमार अक्षय कुमारने पडद्यावर खलनायकाची भूमिका करण्याचा दोन वेळा प्रयत्न केला. प्रथम तो गुड्ड धनोआ यांच्या अफलातूनमध्ये खलनायक बनला. यामध्ये त्याचा डबल रोल होता, ज्यात एक नायक आणि दुसरा खलनायक होता. चित्रपट बॉक्स आॅफिसवर चालला नाही मात्र अब्बास मस्तान यांच्या अजनबीमध्ये अक्षय कुमारला पसंत केले गेले. संजय दत्त संजय दत्तचा किस्सा कोणी विसरू शकणार आहे. त्याला सुभाष घई यांनी त्यावेळी खलनायक केले, जेव्हा तो नायक म्हणून यशस्वी झाला होता. खलनायकच्या अनेक वर्षांनंतर अग्निपथच्या रिमेकमध्ये (डैनीच्या भूमिकेत.) संजयला खूप पसंती मिळाली. इतर कलाकारांचेदेखील प्रयत्न अनिल कपूरने संजय गुप्ता यांच्या मुसाफिरमध्ये खलनायकाची भूमिका केली, मात्र चित्रपट बॉक्स आॅफिसवर जास्त चालली नाही. जॉन अब्राहमने अमिताभ बच्चनसोबत ऐतबार (अभिनेत्री बिपाशा बसू) मध्ये अशीच भूमिका केली होती. नुकतेच एक व्हिलेनमध्ये रितेश देशमुख दिसला होता. बदलापूरमध्येही वरुण धवनच्या भूमिकेत ग्रे शेडस होते. वरुण धवन यांच्या ढिशूंम चित्रपटात तो खलनायक बनला आहे. पुढील वषीर्हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आधी शाहरुख खान (बाजीगर आणि डर) किंवा यशराज यांच्या धूम सीरिजचा उल्लेख यासाठी जोडला जात नाही, कारण शाहरुखला पुनरागमनाची भीती नव्हती आणि धूम सीरिजच्या तीनही चित्रपटात नायकापेक्षा खलनायक कोणत्याच बाबतीत कमी नव्हते. कदाचित असेही म्हणता येईल की, ते चित्रपटातील नायकच होते.