Join us

जिथे जाई, तिथे आमिर खानच्या हातात दिसे ‘उशी’, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 06:00 IST

आमिर एअरपोर्टवर दिसतो खरा. पण यादरम्यान त्याचा स्टाईलिश लूक नाही तर त्याच्या हातातील पिलो अर्थात उशी अधिक लक्ष वेधून घेते.

ठळक मुद्देतूर्तास आमिर त्याचा आगामी चित्रपट ‘रूबरू रोशनी’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. येत्या प्रजासत्ताक दिनी टेलिव्हिजनवर हा चित्रपट प्रदर्शित होतोय.

एअरपोर्टवर आमिर खानच्या हातात का दिसते उशी ?बॉलिवूड स्टार्सचा एअरपोर्ट लूक हा चर्चेचा विषय असतो. त्यामुळेच अनेक स्टार्स आकर्षक स्टाईल व गेटअपमध्ये प्रवास करताना दिसतात. पण आमिर खान मात्र याला अपवाद म्हणायला हवा. आमिर एअरपोर्टवर दिसतो खरा. पण यादरम्यान त्याचा स्टाईलिश लूक नाही तर त्याच्या हातातील पिलो अर्थात उशी अधिक लक्ष वेधून घेते. होय, आमिर कुठेही जावो, त्याची उशी त्याच्यासोबत असते. आमिर या भल्यामोठ्या उशीला अगदी हातात घेऊन प्रवास करतो. आता ही खास उशी सतत सोबत बाळगण्याचे कारण काय, तर झोप.

होय, आमिर खान आपल्या कामात जसा परफेक्शनिस्ट आहे, तसाच आपल्या झोपेच्या बाबतीतही त्याला तडजोड मान्य नाही. योग्य, आरामदायक उशी नसेल तर आमिरला झोप येत नाही. त्यामुळे आमिर सतत आपली नेहमीची उशी सोबत बाळगणेचं योग्य समजतो. दूरच्या प्रवासात ही उशी त्याच्या सतत सोबत असते.

तूर्तास आमिर त्याचा आगामी चित्रपट ‘रूबरू रोशनी’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. येत्या प्रजासत्ताक दिनी टेलिव्हिजनवर हा चित्रपट प्रदर्शित होतोय. गतवर्षी आलेल्या आमिरच्या ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ या चित्रपटाने प्रेक्षकांची प्रचंड निराशा केली. या चित्रपटाकडून प्रेक्षकांना अपार अपेक्षा होत्या. पण ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ प्रदर्शित झाला आणि या अपेक्षांवर पाणी फेरले गेले. ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ फ्लॉप झाल्यावर आमिरने प्रेक्षकांची माफीही मागितली. या चित्रपटानंतर आमिरने ‘गजनी 2’ वर काम सुरु केले असल्याची खबर आहे. अर्थात अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.

टॅग्स :आमिर खान