Join us

लग्न नाही तर ‘हे’ आहे प्रियांका चोप्रा व निक जोनासच्या जोधपूर दौऱ्याचे कारण!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 21:15 IST

होय, हे कपल जोधपूरमध्ये आपले वेडिंग डेस्टिनेशल फायनल करण्यासाठी नाही तर एका वेगळ्याच कारणाने गेले होते.

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनास या दोघांच्या साखरपुड्यानंतर आता या कपलच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. गत मंगळवारी हे कपल जोधपूरात दिसले आणि एका वेगळ्याच चर्चेला उधाण आले. होय, प्रियांका व निक जोधपूरमध्ये रॉयल वेडिंग करण्याच्या बेतात असल्याने येथे लग्नाचे स्थळ फायनल करण्यासाठी गेलेत, असे सांगितले गेले. जोधपूरच्या एका ज्वेलरी शॉपमध्ये प्रियांका व निक खरेदी करतानाही दिसले. पण आता प्रियांका व निकच्या जोधपूर भेटीमागचे खरे कारण समोर आले आहे. होय, हे कपल जोधपूरमध्ये आपले वेडिंग डेस्टिनेशल फायनल करण्यासाठी नाही तर एका वेगळ्याच कारणाने गेले होते. हे कारण म्हणजे, प्रियांकाच्या जवळच्या मैत्रिणीच्या पतीचे बर्थ डे सेलिब्रेशन.

होय, प्रियांकाने आपल्या सोशल अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत प्रियांका व निक कुणाचा तरी बर्थ डे सेलिब्रेट करताना दिसत आहेत. प्राप्त माहितीनुसार, प्रियांकाची जीवलग मैत्रिण तमन्ना दत्त हिचा पती सुदीप दत्त याच्या बर्थ डे सेलिब्रेशनचे हे फोटो आहेत. 

याच बर्थ डे सेलिब्रेशनसाठी प्रियांका व निक जोधपूरला गेले होते. या फोटोत प्रियांका व निक सुदीप व तमन्नासोबत दिसतेय, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा महाराजा,’ असे हे फोटो शेअर करताना प्रियांकाने लिहिले आहे.

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास