Join us

पत्नी व मुलांसोबत दुबईत शिफ्ट होतोय नवाजुद्दीन सिद्दीकी, हे आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 14:32 IST

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पत्नी आलिया यांच्या वैवाहिक आयुष्यातील वाद आता मिटला आहे. गतवर्षी हा वाद इतका विकोपाला पोहोचला होता की, प्रकरण घटस्फोटापर्यंत आले होते.

ठळक मुद्दे​​​​​​​आलिया व मुलांना दुबईत सोडून नवाजुद्दीन काही दिवसांसाठी लंडनला रवाना होणार आहे. इथे तो त्याच्या ‘हिरोपंती 2’ या सिनेमाचे शूटींग करणार आहे

बॉलिवूडचा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) आणि त्याची पत्नी आलिया यांच्या वैवाहिक आयुष्यातील वाद आता मिटला आहे. होय, गतवर्षी हा वाद इतका विकोपाला पोहोचला होता की, प्रकरण घटस्फोटापर्यंत आले होते. पण आता हा वाद मिटला असून नवाज व आलिया पुन्हा एकत्र राहत आहेत. आता काय तर नवाज व आलिया आपल्या दोन्ही मुलांसोबत दुबईला शिफ्ट होण्याच्या तयारीत आहेत. एका ताज्या मुलाखतीत खुद्द आलियाने ही माहिती दिली. शिवाय दुबईत शिफ्ट होण्याच्या निर्णयामागचे कारणही सांगितले.  टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत आलियाने दुबईत शिफ्ट होणार असल्याची बातमी खरी असल्याचे स्पष्ट केले.  

तिने सांगितले, आम्ही दुबईमध्ये शिफ्ट होत आहोत, हे अगदी खरे आहे.  आमची दोन्ही मुले शोरा आणि यानी तिकडेच शिक्षण घेणार आहेत. भारतात सध्या ऑनलाइन शाळा सुरु आहेत. येत्या काही वर्षापर्यंत ही परिस्थिती बदलेल, असे वाटत नाही. त्यामुळे आम्ही मुलांना दुबईमधील शाळेत टाकले आहे.  मुलं शिक्षणावर लक्ष केंद्रीत करु शकत नाहीत, घरातील वातावरणाचाही त्यांच्या शिक्षणावर परिणाम होतो. घरी बसून शिकणे आणि शाळेत जाणे, यात बराच फरक आहे. त्यामुळे  आम्ही लवकरात लवकर दुबई जाण्याचा प्रयत्न करत आहोत.

आलिया व मुलांना दुबईत सोडून नवाजुद्दीन काही दिवसांसाठी लंडनला रवाना होणार आहे. इथे तो त्याच्या ‘हिरोपंती 2’ या सिनेमाचे शूटींग करणार आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफ व तारा सुतारिया मुख्य भूमिकेत आहेत. सध्या नवाज कुटुंबासोबत  कसारा येथील फार्महाऊसवर आहे.  

टॅग्स :नवाझुद्दीन सिद्दीकी