Join us
Daily Top 2Weekly Top 5

कधीकाळी नाईट क्लबमध्ये गायची बॉलिवूडची ही प्रसिद्ध गायिका, आज आहे टॉपची सिंगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 14:37 IST

चेन्नईच्या माऊंट रोडस्थित जेम्स नामक एका लहानशा नाईटक्लबमध्ये त्यांनी गाण्याची कारकिर्द सुरु केली

जो माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो तो आयुष्यात कधीही अपयशी होत नाहीत. त्याला यशाचा मार्ग सापडतो. गायिका उषा उत्थुप  हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. आज त्यांचा 76 वा वाढदिवस आहे. उषा उत्थुप हे नाव उच्चारले तरी एक सळसळत्या उत्साहाचा भास होतो. 7 नोव्हेंबर 1947 रोजी मुंबईत जन्मलेल्या उषा यांनी भरजरी कांचीपुरम साडी, केसांत गजरा, कपाळावर भली मोठी बिंदी लावून रॉक, जॅझ गाणाऱ्या गायिकने आज एक ट्रेडमार्क सेट आहे.  

 20 वर्षी चेन्नईच्या एका नाईट क्लबमध्ये गाण्यासाठी त्या उभ्या राहिल्या. साडी नेसून चेन्नईच्या माऊंट रोडस्थित जेम्स नामक एका लहानशा नाईटक्लबमध्ये त्यांनी गाण्याची कारकिर्द सुरु केली. नाईट क्लबच्या मालकाला त्यांचा आवाज आवडला आणि त्याने उषा यांना आणखी आठवडाभर थांबण्याची विनंती केली. यानंतर उषा यांनी मुंबईच्या ‘टॉक ऑफ द टाऊन’ आणि कोलकात्याच्या ‘ट्रिनकस’ यासारख्या नाईट क्लबमध्ये गाणे सुरु केले. यानंतर दिल्लीच्या ओबेरॉय हॉटेलातही त्यांनी गायले.

याच ओबेरॉय हॉटेलमध्ये उषा यांची भेट अभिनेते शशी कपूर यांच्याशी झाली. उषांचे गाणे ऐकून ते इतके मंत्रमुग्ध झाले की, त्यांनी उषा यांना चित्रपटात गाण्याची संधी दिली. 1970 मध्ये उषा यांनी ‘बॉम्बे टॉकिज’ या सिनेमात एक इंग्रजी गाणे गायले आणि यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. शालीमार, शान, वारदात, प्यारा दुश्मन, अरमान, दौड, डिस्को डान्सर, भूत, जॉगर्स पार्क अशा अनेक सिनेमांत त्यांनी गाणी गायली. विशाल भारद्वाज यांच्या ‘सात खून माफ’ या सिनेमात त्यांनी गायलेले ‘डार्लिंग’ हे गाणे तर तुफान गाजले. 

टॅग्स :सेलिब्रिटी