Join us

करिना कपूरशी बोलण्यासाठी चाहत्याने केले तिचे प्राप्तीकर अकाउंट हॅक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2017 10:37 IST

आपल्या आवडत्या  सेलिब्रेटींना भेटण्याची, त्यांच्याशी बोलण्याची एक संधी मिळावी म्हणून यासाठी चाहते काय काय करीत नाहीत? त्यांच्या घराबाहेर दिवस-रात्र ...

आपल्या आवडत्या  सेलिब्रेटींना भेटण्याची, त्यांच्याशी बोलण्याची एक संधी मिळावी म्हणून यासाठी चाहते काय काय करीत नाहीत? त्यांच्या घराबाहेर दिवस-रात्र उभे राहणे, ते शूटींग करीत असतील तेथे ताटकळत वाट पाहणे, त्यांचे ध्यान आकर्षित करण्यासाठी काही तरी ‘आततायी’पणा करणे (जसे की, रक्ताने पत्र लिहिणे). मात्र आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात असे ‘क्रेझी फॅन्स’देखील टेक्नोसॅव्ही झाले आहेत. त्याची प्रचीती करिना कपूर-खानच्या एका ‘डाय हार्ड’ फॅनच्या कृत्यामुळे आली.आतापर्यंत तुम्ही फेसबुक, ट्विटर यासारखे सोशल मीडिया अकाउंट हॅक झाल्याचे ऐकले असेल; मात्र करिनाचा मोबाइल क्रमांक मिळवण्यासाठी एका ‘चाहत्या’ने चक्क तिचे प्राप्तिकराचे (आयटी) अकाउंटच हॅक केले. सायबर सेलने या चाहत्याचा शोध घेऊन त्याला अटक केले आहे. विशेष म्हणजे, तो निमलष्करी दलातील कर्मचारी आहे. करिनाचे आयकर खात्याच्या ‘ई-फायलिंग’चे अकाउंट हॅक झाल्याचे तिच्या सीएच्या लक्षात आले. हॅकरने तिचे २०१६-२०१७चे बनावट प्राप्तिकर विवरणपत्र तयार करून, ते प्राप्तिकर विभागाकडे ई-फाइल केले होते. उल्लेखनीय म्हणजे, त्यात तिचे वास्तवापेक्षा कमी उत्पन्न दाखवले होते. या प्रकरणी तिच्या सीएने आॅक्टोबरमध्ये सायबर सेलकडे तक्रार दिली होती. त्यानंतर, सायबर सेलचे पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या तपासात, या गुन्ह्यात राज्याबाहेरील हॅकरचा हात असल्याचे स्पष्ट झाले. मोबाईवरून हॅकिंग झाल्याचे कळाल्यावर आयपी अ‍ॅड्रेसवरून हॅकरचा शोध घेण्यात आला. तो मोबाईल निमलष्करी दलातील कर्मचारी मनोज तिवारीचा (२६) होता. त्याच्याच्याकडे अधिक विचारणा करताच, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.प्रातिनिधिक फोटोहॅकिंग झाली कशी?हॅकर मनोज  हा बेबोचा चाहता असून, तिचा मोबाइल क्रमांक मिळविण्यासाठी त्याने हा प्रकार केल्याचे समोर आले. हा कर्मचारी प्राप्तिकराच्या ई-फायलिंगचे काम करायचा. त्यामुळे प्राप्तिकर खात्याकडे करिनाचा मोबाइल क्रमांक असेल, अशी त्याला खात्री वाटत होती. त्यातूनच त्याने इंटरनेटवरून करिनाचा पॅन कार्ड क्रमांक मिळविला.त्याच्या आधारे ई-इंटर मेडिएटर सॉफ्टवेअरचा वापर करून तिचे अकाउंट हॅक केल्याचे तपासात उघड झाली. या प्रकरणी सायबर पोलिसांनी त्याला अटक केली असून, अधिक तपास सुरू असल्याची माहिती सचिन पाटील यांनी दिली.