Hema Malini On Husband Dharmendra:बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र आता या जगात नाहीत. २४ नोव्हेंबर २०२५ या दिवशी त्यांचं निधन झालं.वयोपरत्वे आलेल्या आजारपणामुळे धर्मेंद्र यांना मुंबईतील ब्रिच कॅन्डी रुग्णायलयात उपचार सुरु होते. यादरम्यान, त्यांची प्राणज्योती मालवली. धर्मेंद्र या जगात नसले तरीही ते आपल्या कलाकृतींमधून कायम जिवंत राहतील. नुकत्याच पार पडलेल्या बाफ्टा पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडच्या ही-मॅनला श्रद्दांजली अर्पण करण्यात आली. अशातच आंतरराष्ट्रीय स्तरावर धर्मेंद्र यांचा केलेला सन्मान पाहून हेमा मालिनी गहिवरून गेल्या आहेत. अलिकडेच माध्यमांसोबत संवाद साधताना त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
अलिकडेच व्हरायटी इंडियाशी बोलताना हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांना वाहण्यात आलेली श्रद्धांजली हृदयस्पर्शी असल्याचं म्हटलं. त्या म्हणाल्या... धर्मेंद्र हे असे व्यक्ती होते ज्यांच्यावर जगभरात चाहते होते ज्यांनी कायम त्यांच्या कलाकृतींवर प्रेम केलं. यावेळी धर्मेंद्र यांच्या आठवणीत हेमा मालिनी भावुक झाल्याच्या पाहायला मिळाल्या."मला प्रत्येक क्षणी त्यांची आठवण येते. मी स्वतःला विचारत राहते, ते खरोखरच या जगात नाही आहेत का? मी त्यांना पुन्हा कधी भेटू शकेन का?"
यादरम्यान, हेमा यांना धर्मेंद्र यांच्या आवडत्या चित्रपटाबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितलं, तेव्हा त्यांनी चुपके चुपके सिनेमाचा उल्लेख केला. शिवाय त्यांना धर्मेंद्र यांचा शोले सिनेमा आजही तितकाच आवडतो.त्या म्हणाल्या की हा चित्रपट त्यांच्या हृदयाच्या जवळ आहे.हेमा पुढे म्हणाल्या, "मी त्यांचे सर्व चित्रपट पाहिलेले नाहीत. वेळ मिळताच मी ते एक-एक करून नक्कीच पाहण्याचा प्रयत्न करेन."
हेमा आणि धर्मेंद्र यांचं लग्न १९८० मध्ये झालं. त्यांना दोन मुली आहेत, ईशा आणि अहाना. धर्मेंद्र यांनी हेमा जवळपास ४६ वर्ष नेटाने संसार केला.
Web Summary : Hema Malini is heartbroken after Dharmendra's passing in 2025. She fondly remembers him, especially his work in 'Chupke Chupke' and 'Sholay'. She misses him every moment and cherishes their 46 years together.
Web Summary : 2025 में धर्मेंद्र के निधन के बाद हेमा मालिनी दुखी हैं। वे उन्हें प्यार से याद करती हैं, खासकर 'चुपके चुपके' और 'शोले' में उनके काम को। उन्हें हर पल उनकी याद आती है और वे उनके 46 साल के साथ को संजोती हैं।