Join us
Daily Top 2Weekly Top 5

'हिरामंडी' फेम शर्मिन सहगलच्या घरी आला नवा पाहुणा, लग्नाच्या २ वर्षांनी संजय लीला भन्साळींची भाची झाली आई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 09:02 IST

'हिरामंडी' फेम बॉलिवूड अभिनेत्री शर्मिन सहगलने गुडन्यूज दिली आहे. शर्मिन सहगल नुकतीच आई झाली आहे.

'हिरामंडी' फेम बॉलिवूड अभिनेत्री शर्मिन सहगलने गुडन्यूज दिली आहे. शर्मिन सहगल नुकतीच आई झाली आहे. शर्मिनच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं आहे. लग्नानंतर दोन वर्षांनी शर्मिनच्या घरी पाळणा हलला आहे. वरिष्ठ पत्रकार विक्की लालवाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. 

शर्मिनने २०२३ मध्ये टोरेंट फार्मास्युटिकल्सचे कार्यकारी संचालक अमन मेहता यांच्याशी लग्न केलं होतं. इटलीमध्ये कुटुंबीय आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत ते लग्नबंधनात अडकले होते. लग्नानंतर दोन वर्षांनी ते आईबाबा झाल्याने घरी आनंदाचं वातावरण आहे. अमन मेहता यांच्याशी लग्न झाल्यानंतर शर्मिन हैदराबादला शिफ्ट झाली आहे.  

शर्मिन सहगल ही बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची भाची आहे. २०१९ मध्ये 'मलाल' सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 'अतिथी भूतो भव' या सिनेमातही ती दिसली होती. संजय लीला भन्साळींच्या 'हिरामंडी' वेब सीरिजमुळे शर्मिन प्रसिद्धीझोतात आली होती. या सीरिजमध्ये तिने आलमजेब ही भूमिका साकारली होती.  

टॅग्स :संजय लीला भन्साळीसेलिब्रिटी