बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी सतत या ना त्या कारणांनी चर्चेत असते. कधी टायगर श्रॉफमुळे, कधी आदित्य ठाकरेंसोबतच्या मैत्रीमुळे तर कधी हॉट फोटो व व्हिडीओंमुळे. मात्र आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. दिशाच्या स्ट्रगलिंग काळात टेलिव्हिजन अभिनेता पार्थ समथानसोबत रिलेशनशीपमध्ये होती. पार्थ आणि दिशा अडीच वर्षे एकमेकांना डेट करत होते. मात्र रिलेशनशीपमध्ये असताना जेव्हा दिशाला पार्थ फसवत असल्याचा संशय आला आणि तिने त्याच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
दिशा आणि पार्थशी निगडीत सूत्रांनी सांगितले की, पहिल्यांदा जेव्हा दिशाने पार्थला चीटिंग करताना पकडले तेव्हा त्याला माफ करत दुसरी संधी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र जेव्हा संधी देऊनही दुसऱ्यांदाही त्याने तसेच केले तेव्हा दिशाने नाते संपवण्याचा निर्णय घेतला. ब्रेकअपनंतर ४ महिन्यांच्या आत दिशाला समजले की पार्थ तिच्यासोबत विकास गुप्तालाही डेट करत होता.
दिशाचा पार्थवर पूर्ण विश्वास होता मात्र जेव्हा पार्थला चिटींग करताना पकडले त्यानंतर तिने त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी त्याचा फोन चेक करायला सुरूवात केली होती. जेव्हा दुसऱ्यांदा त्याने फसविले त्यानंतर दिशा पटानी कोलमडून गेली होती. त्याच्यापासून वेगळी झाल्यानंतर दिशाने आपल्या करिअरकडे लक्ष केंद्रीत केले होते.