तुम्हारी सुलू या चित्रपटातील विद्या बालन तुम्ही पाहिलीत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 13:13 IST
विद्या बालनचा कहानी २ः दुर्गा राणी सिंग हा चित्रपट गेल्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटातील भूमिकेचे प्रचंड ...
तुम्हारी सुलू या चित्रपटातील विद्या बालन तुम्ही पाहिलीत का?
विद्या बालनचा कहानी २ः दुर्गा राणी सिंग हा चित्रपट गेल्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटातील भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते. त्यानंतर विद्याचा आता आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच करण्यात आले आहे.तुम्हारी सुलु असे विद्याच्या आगामी चित्रपटाचे नाव असून या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये एका बाईच्या हातात खूप सारे गिफ्ट्स आणि भाजीची पिशवी आपल्याला दिसत आहे. ही बाई दुसरी कोणीही नसून विद्या बालन आहे. पण तिच्या चेहऱ्यापर्यंत अनेक गिफ्ट्स असल्याने आपल्याला तिचा चेहराच दिसत नाही. त्यामुळे विद्याचा या चित्रपटातील लूक कसा असणार आहे हे चित्रपटाच्या टीमने गुलदस्त्यातच ठेवले आहे. विद्याचा लूक परिणिती या तिच्या पहिल्या चित्रपटापासूनच सगळ्या चित्रपटांमध्ये खूप वेगळा पाहायला मिळाला आहे. त्यामुळे विद्या आता नव्या कोणत्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे याची नक्कीच तिच्या फॅन्सना उत्सुकता लागली आहे. विद्या बालनच्या तुम्हारी सुलु या चित्रपटाचे पोस्टर अतुल कसबेकर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट केले आहे. अतुल या चित्रपटाचा निर्माता असून त्याच्यासोबतच भूषण कुमार, तनुज गर्ग, शांती सीवराम मैनी या चित्रपटाचे निर्माते आहेत. त्याने या चित्रपटाच्या पोस्टरसोबतच तुम्हारी सुलु हा माझा नवा चित्रपट असून या चित्रपटात एका खूप चांगल्या भूमिकेत विद्या दिसणार असल्याचे म्हटले आहे. तुम्हारी सुलू या चित्रपटाची कथा सुलु या स्त्रीच्या अवतीभवती फिरणार आहे. सुलु ही व्यक्तिरेखा विद्या बालन साकारणार असून ती या चित्रपटात आरजेच्या भूमिकेत दिसणार आहे. तिने याआधी देखील मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटात आरजेची भूमिका साकारली होती. ही सुलु रात्रीच्या शोंचे सूत्रसंचालन करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्हारी सुलु या चित्रपटाचे दिग्दर्शन सुरेश त्रिवेदी करत असून या चित्रपटात नेहा धुपिया देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. Also Read : हम पाचचा तिसरा सिझन लवकरच