Join us

तुम्ही शबाना आझमी यांचा हा अंदाज कधी पाहिलाय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2017 11:27 IST

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री,सामाजिक कार्यकर्त्या, प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्या पत्नी आणि फरहान आणि झोया अख्तर यांच्या आई अशी ज्यांची ...

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री,सामाजिक कार्यकर्त्या, प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्या पत्नी आणि फरहान आणि झोया अख्तर यांच्या आई अशी ज्यांची ओळख त्या म्हणजे शबाना आझमी. कोणताही कार्यक्रम असो किंवा पार्टी शबाना आझमी आपल्या साध्या अवतारात तिथं उपस्थिती लावतात.अंदाज साधा असला तरी शबाना आझमी लोकप्रियता आणि त्यांचा चार्म त्यांच्या उपस्थितीला चारचाँद लावून जातो.शबाना आझमी यांच्या नावाभोवती एक वेगळं वलय आहे.त्यामुळे त्या जे काही बोलतात,जे काही करतात त्याला आपसुकच एक वेगळं महत्त्व प्राप्त होतं.त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे रसिकांचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माध्यमांचंही तितकंच बारीक लक्ष असतं.त्यांच्या बोलण्यातली एकही गोष्ट चुकू नये यासाठी सारे त्यांना लक्षपूर्वक ऐकत आणि पाहत असतात.मात्र अशाच एका कार्यक्रमात शबाना आझमी यांचं कधीही न पाहिलेलं रुप माध्यमांच्या कॅमे-यांनी टिपलं.शबाना आझमी यांची ती छबी काही माध्यमांनी अचूक हेरली. कारण त्या छबीत शबाना आझमी यांचा कधीही न पाहिलेला अंदाज कैद झाला होता.या फोटोमध्ये शबाना आझमी चक्क जीभ बाहेर काढून असल्याचं पाहायला मिळतंय.आता शबाना आझमी यांनी जीभ बाहेर का काढली,त्या कुणाकडे पाहून इतक्या आश्चर्यचकीत झाल्या हे मात्र समजू शकलेलं नाही.मात्र त्यांचा हा आश्चर्यचकीत झालेला हा अंदाज सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे.शबाना आझमी यांनी आपल्या सिनेकारकिर्दीत विविध भूमिका साकारल्या. तरुणपणी काम केलेल्या सिनेमात अवखळ आणि अल्लड रुपातल्या शबाना आझमी रसिकांनी पाहिल्या होत्या.मात्र कालांतराने शबाना आझमी रुपेरी पडद्यावर गंभीर आणि चरित्र भूमिका साकारु लागल्या.त्यांच्या रिल भूमिकांचं दर्शन त्यांच्या रियल लाईफमध्येही पाहायला मिळालं.कायमच साध्या सरळ अंदाजात आणि चार्मिंग अंदाजात शबाना आझमी पाहायला मिळतात.मात्र त्या एका कार्यक्रमात मात्र शबाना आझमी यांचं एक आगळवेगळं रुप कॅमे-याच्या लेन्समध्ये कैद झालं.