Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धा बनणार ‘हसीना’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2016 11:39 IST

बागी सिनेमानंतर अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या चांगलीच फॉर्मात आहे. आता श्रद्धा कपूर हसीना बनणार आहे.. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची ...

बागी सिनेमानंतर अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या चांगलीच फॉर्मात आहे. आता श्रद्धा कपूर हसीना बनणार आहे.. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकरची भूमिका साकारणार आहे.. सुरुवातीला ही भूमिका दबंग गर्ल अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा साकारणार होती.. या भूमिकेसाठी सोनाक्षी उत्सुक होती.. मात्र जॉन अब्राहमच्या अपघातामुळं फोर्स-2 सिनेमाचं शुटिंग लांबणीवर पडलं.. त्यामुळं सोनाक्षीच्या डेट्सची अडचण झाली.. त्यामुळं सोनाक्षी हसीनाच्या भूमिकेसाठीचं आपलं नाव मागे घेतलं आणि तिच्या जागी आता श्रद्धाची वर्णी लागलीय.. या सिनेमाचं नाव हसीना- द क्वीन ऑफ मुंबई असं असणार आहे.. दाऊद इब्राहिमला 12 बहिण भाऊ होते.. त्यापैकी सातवी हसीना होती.. मुंबईतल्या नागपाडा परिसरात राहणा-या हसीनाचं 2014 मध्ये निधन झालंय..