Join us
Daily Top 2Weekly Top 5

  आता टायगर श्रॉफसोबत दिसणार ‘सिम्बा गर्ल’ सारा अली खान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2018 20:06 IST

होय, ‘केदारनाथ’ व ‘सिम्बा’नंतर साराच्या हाती आणखी एक बिगबजेट चित्रपट लागला आहे. या चित्रपटात सारा टायगर श्रॉफसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे.

ठळक मुद्दे‘बागी’ व ‘बागी 2’ या दोन्ही चित्रपटांना पे्रक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. ‘बागी’मध्ये टायगर श्रॉफसोबत श्रद्धा कपूर दिसली होती. दोघांचीही आॅनस्क्रिन केमिस्ट्री जबरदस्त होती.

सैफ अली खानची लेक सारा अली खान आपल्या पहिल्याच चित्रपटाने चर्चेत आली. ‘केदारनाथ’मधून साराचा डेब्यू झाला. या चित्रपटातील साराच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले. लवकरच साराचा दुसरा चित्रपट ‘सिम्बा’ रिलीज होतोय. या चित्रपटानंतरही साराकडे चित्रपटांची रांग लागली आहे. होय, ‘केदारनाथ’ व ‘सिम्बा’नंतर साराच्या हाती आणखी एक बिगबजेट चित्रपट लागला आहे. या चित्रपटात सारा टायगर श्रॉफसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. आता हा चित्रपट कुठला, हे जाणून घेण्यास तुम्ही उत्सूक असाल. तर या चित्रपटाचे नाव आहे, ‘बागी 3’. होय, चर्चा खरी मानाल तर साजिद नाडियाडवाला यांनी या चित्रपटासाठी साराशी संपर्क साधला आहे. आता या चर्चेत किती सत्यता आहे, हे तर काळचं सांगेल. 

‘बागी’ व ‘बागी 2’ या दोन्ही चित्रपटांना पे्रक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. ‘बागी’मध्ये टायगर श्रॉफसोबत श्रद्धा कपूर दिसली होती. दोघांचीही आॅनस्क्रिन केमिस्ट्री जबरदस्त होती. ‘बागी’ हिट झाल्यानंतर याच्या सीक्वलमध्ये टायगरसोबत त्याची कथित गर्लफ्रेन्ड दिशा पटानी झळकली. टायगर व दिशाचा रोमान्सही हिट झाला. प्रेक्षकांना हा चित्रपट भावला. या दोन्ही चित्रपटाच्या यशानंतर ‘बागी 3’ची तयारी सुरु झाली आहे. आता केवळ यातील टायगर व साराचा रोमान्स प्रेक्षकांना किती भावतो, तेच बघायचेय.  तूर्तास सारा ‘सिम्बा’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्या अपोझिट रणवीर सिंग दिसणार आहे. रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट येत्या २८ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. 

टॅग्स :सारा अली खानटायगर श्रॉफ