Join us

हर्षवर्धन-आलियाने करावे एकत्र काम !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2016 11:05 IST

 नुकतेच ‘मिर्झियाँ’ चित्रपटाचे शीर्षक गीत रिलीज करण्यात आले आहे. यात मिर्झा -साहिबान यांची लव्हस्टोरी चित्रीत करण्यात आली आहे. हर्षवर्धन ...

 नुकतेच ‘मिर्झियाँ’ चित्रपटाचे शीर्षक गीत रिलीज करण्यात आले आहे. यात मिर्झा -साहिबान यांची लव्हस्टोरी चित्रीत करण्यात आली आहे. हर्षवर्धन क पूर आणि सैयामी खेर हे दोघे चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.सैयामीचा हा पहिलाच चित्रपट असून अक्षय कुमार, प्रियांका चोप्रा, फवाद खान अशा अनेकांनी गाण्याचे कौतुक केले. ‘बी टाऊन’ च्या कलाकारांच्या अशा प्रतिक्रिया पाहिल्यावर हर्षवर्धनची बहीण सोनम कपूर हिलाही खुप अभिमान वाटला.सोनम म्हणते,‘ तिच्या भावाने आलिया भट्ट सोबत काम करावे. सध्या आलिया तिच्या करिअरच्या ‘पिक ’ पॉर्इंटवर असल्याने चांगलीच फॉर्मात आहे. त्यामुळे टिवटरवर आलिया आणि हर्षवर्धन यांच्यातील चर्चेत सोनमने सांगितले की,‘ तुम्ही दोघांनी एकत्र काम करायला हवे.’