हर्षवर्धनची टेस्ट खूपच खराब!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 13:01 IST
समजा एखादी बहीण आपल्या भावाविषयी सांगताना, त्याची टेस्ट (मुलींची निवड) खूपच खराब आहे, असे म्हणत असेल तर तुम्ही काय ...
हर्षवर्धनची टेस्ट खूपच खराब!
समजा एखादी बहीण आपल्या भावाविषयी सांगताना, त्याची टेस्ट (मुलींची निवड) खूपच खराब आहे, असे म्हणत असेल तर तुम्ही काय म्हणाल? असेच घडलेय हर्षवर्धन कपूरच्या बाबतीत. दुसरे तिसरे कुणी नाही तर चक्क सोनम कपूरने हर्षवर्धनची टेस्ट खूपच खराब असल्याचे सांगितले. केवळ एवढेच नाही तर हर्षवर्धनबद्दल असेच बरेच खुलासेही तिने केले. यामुळे हर्षवर्धन इतका काही लाजला की, काय बोलावे नि काय नाही, हेच त्याला कळेना. नेहा धुपियाचा शो ‘नो फिल्टर नेहा’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. नेहाच्या याच शोमध्ये सोनम कपूर व हर्षवर्धन कपूर या दोघा बहिण-भावाने हजेरी लावली. यावेळी सोनमने हर्षवर्धनबद्दल अनेक खुलासे केले. सोनम म्हणाली, ‘हर्ष अनेक मुलींना आवडतो. मात्र याची टेस्ट खूप खराब आहे. माझ्या किंवा रियासारख्या सुंदर मुलींसोबत त्याला डेटवर जायचेच नाही’. एवढे बोलून सोनम थांबली नाही तर तिने हर्षवर्धनच्या गर्लफ्रें डविषयी सुद्धा आपले मत मांडले. ती गोड आहे, पण अजब आहे. खराब नाही पण तिच्यापेक्षा चांगली याला मिळाली असती. मुलीबाबत तुझी टेस्ट एवढी खराब का आहे रे..? असा सवालच तिने हर्षवर्धनला केला. सोनमच्या या प्रश्नाने हर्षवर्धन चांगलाच बावरला. यानंतर तर सोनम हर्षवर्धनची चांगलीच मौज घेताना दिसली. ‘ मला विश्वास आहे, तू ‘प्रोटेक्शन’ यूज करत असशील’, असे सोनम म्हणाली. सोनमच्या या वाक्याने हर्षवर्धनचा चेहरा लाजरा बुजरा झाला.काय बोलावे हेच त्याला कळेना. शेवटी काय तर कसेबसे हसत त्याने ही वेळ मारून नेली.