Join us

हर्षवर्धन, मला तुझा अभिमान वाटतो - अर्जुन कपूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2016 17:46 IST

अभिनेता अर्जुन कपूर आपल्या चुलत भाऊ हर्षवर्धन कपूरच्या अभिनयाने चांगलाच प्रभावित झालेला दिसतो. ‘मिर्झिया’ या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगनंतर त्याने ...

अभिनेता अर्जुन कपूर आपल्या चुलत भाऊ हर्षवर्धन कपूरच्या अभिनयाने चांगलाच प्रभावित झालेला दिसतो. ‘मिर्झिया’ या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगनंतर त्याने ट्विट करून हर्षवर्धनला कॉम्पिमेंट दिले आहे. आपल्या ट्विटर पोस्टमध्ये तो म्हणतो, हर्षवर्धन ‘मला तुझा अभिमान वाटतो’. राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘मिर्झिया’ हा चित्रपट शुक्र वारी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातून अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूर व सैयमी खेर बॉलिवूडमध्ये पदार्पन करीत आहे. हा चित्रपट मिर्झा-साहिबान यांची लव्ह स्टोरी असल्याचे सांगण्यात येते. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हा चित्रपट भूतकाळ व वर्तमान याचा मिलाफ असेल असे दिसते. याचमुळे या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.दरम्यान अर्जुनने ट्विट करून हर्षवर्धनची प्रसंशा करून ही उत्सुकता शिगेला पोहचविली असल्याचे दिसते. तो म्हणतो, ‘‘हर्षवर्धन, तुझा मला अभिमान वाटतो, तुझे टॅलेंट सर्व लोकांसमोर येणार आहे, मात्र तू आपले डोके शांत ठेव व तुझे वडील अनिल कपूर यांच्या प्रमाणे कामावर पूर्ण लक्ष दे’’. }}}} ‘‘राकेश ओमप्रकाश मेहरा या चित्रकाराने मिर्झिया नावाची कलाकृती तयार करण्यासाठी हर्षवर्धन व सैयमी नावाच्या दोन ब्रशचा वापर केला आहे असेही त्याने म्हंटले आहे. सैयमी खेरची प्रसंशा करीत तुझे डोळे आकाशासारखे निळे आहेत. तू आगामी चित्रपटातही यापेक्षा सरस ठरशील असेही अर्जुनने आपल्या ट्विटरवर पोस्टवर लिहलेय.