बॉलिवूड म्हणजे नव नवी फॅशन, नव नवे ट्रेंड. बॉलिवूडमध्ये नवा ट्रेंड आला रे आला तरूणाई त्या ट्रेंडने वेडीपिसी झालीच म्हणून समजा. बॉलिवूडमध्ये नव्याने पाऊल ठेवणारा अनिल कपूरचा देखणा मुलगा हर्षवर्धन कपूर हा सुद्धा बहीण सोनम कपूरच्या पावलावर पाऊल ठेवत असाच एक नवा ट्रेड आणू पाहतो आहे. होय, हर्षवर्धनचा ‘मिर्झिया’ लवकरच येतोय. ‘मिर्झिया’च्या दुसºया ट्रेलर लॉन्चवेळी हर्षवर्धनच्या फॅशन स्टाईलने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. हर्षवर्धनने परिधान केलेली ‘पॅन्ट विथ कफलिंक्स’ सगळ्यांच्याच आकर्षणाचे केंद्र ठरली. हर्षवर्धन आणू पाहत असलेल्या या ट्रेंडवर भारतातील तरूणाई येत्या काळात भाळली नाही तर नवल!