Join us

​हर्ष व सैयामीला पुन्हा करायचेयं एकत्र काम!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2016 18:03 IST

हर्षवर्धन कपूर आणि सैयामी खेर  यांनी राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘मिर्झिया’द्वारे वाजत-गाजत बॉलिवूड डेब्यू केले. पण हा चित्रपट सपशेल ...

हर्षवर्धन कपूर आणि सैयामी खेर  यांनी राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘मिर्झिया’द्वारे वाजत-गाजत बॉलिवूड डेब्यू केले. पण हा चित्रपट सपशेल आपटला. पण तरीही हर्ष आणि सैयामी आशावादी आहेत. केवळ आशावादीच नाही तर पुन्हा एकत्र काम करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. होय, दोघेही एकत्र काम करण्यासाठी नव्या कथांच्या शोधात आहे.सूत्रांच्या मते, हर्षवर्धन आणि सैयामी ‘मिर्झिया’नंतरही आपली जोडी कायम ठेवू इच्छितात. त्यामुळे दोघेही एकाचवेळी तीन वेगवेगळ्या कथा शोधत आहेत. जेणेकरून त्यांना पुन्हा एकत्र काम करता येईल. आता यात हर्ष व सैयामी किती यशस्वी होतात, ते आम्हाला ठाऊक नाही. पण प्रामाणिक प्रयत्नानंतर देवही दिसतो म्हणे. कदाचित हर्ष व सैयामीचे एकत्र काम करण्यासाठी चालवलेले हे प्रयत्नही असेच यशस्वी होतील. अर्थात या कामाला वेळ लागणार आहे. त्यामुळे तूर्तास हर्ष व सैयामीने स्वतंत्रपणे आपआपल्या प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित केले आहे.  ‘मिर्झिया’चे अपयश विसरून सैयामीने पुन्हा एकदा साऊथच्या चित्रपटांकडे लक्ष केंद्रीत केले आहे. मणिरत्नम यांच्या चित्रपटात ती झळकणार आहे. लवकरच या चित्रपटाचे शूटींग सुरु होतआहे. सैयामीने २०१५मध्ये ‘रे’ या दाक्षिणात्य चित्रपटापासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.दुसरीकडे हर्षवर्धन कपूर ‘भावेश जोशी’ या चित्रपटात बिझी झाला आहे. या चित्रपटाचे शूटींग अंतिम टप्प्यात आहे. येत्या वर्षांत उन्हाळ्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. केवळ एवढेच नाही तर यानंतर श्रीराम राघवन यांचा एक चित्रपटही हर्षच्या हातात आहे.