Join us
Daily Top 2Weekly Top 5

काय तो टोमणा हार्दिक पांड्यासाठी होता? एक्स गर्लफ्रेन्ड एली अवरामने 5 महिन्यांनंतर केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 17:25 IST

बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींसोबत हार्दिक पांड्याचे नाव जोडले गेले होते. यापैकीच एक म्हणजे एली अवराम.

ठळक मुद्देअभिनेत्री एली अवराम चित्रपटात येण्याअगोदर ‘बिग बॉस’च्या सीजन-७ मध्ये सहभागी झाली होती.

सध्या क्रिकेटपटू हार्दिक पांड्या व त्याची गर्लफ्रेन्ड नताशा स्टँकोव्हिच जाम चर्चेत आहे. लवकरच भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या बाप बनणार आहे. त्याने नुकतीच इंस्टाग्रामवरून ही गोड बातमी शेअर केली होती. हार्दिकने 2020 वर्षाच्या पहिल्याच दिवशी दुबईत बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टँकोव्हिचसह साखरपुडा केला होता. त्यानंतर हे कपल सोबत आहेत. हार्दिक पांड्या एक महान क्रिकेटपटू आहे़. पण गेल्या वर्षापर्यंत प्लेबॉय अशीच त्याची छबी होती. याचे कारण म्हणजे बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींसोबत त्याचे नाव जोडले गेले होते. यापैकीच एक म्हणजे एली अवराम.

एली व हार्दिकच्या अफेअरच्या चर्चा अनेक दिवस होत्या. एलीने कधीही या अफेअरची कबुली दिली नव्हती. पण हो, तिने हार्दिकसोबतचा एक फोटो शेअर केला होता. यानंतर तिच्या व हार्दिकच्या अफेअरच्या चर्चांना बळ मिळाले होते.

हार्दिक व नताशाच्या साखरपुड्यानंतर एलीने एक पोस्ट शेअर केली होती. यात एलीने एकटीचा फोटो शेअर करत, ‘इस बार अपना फरिश्ता खुद बने’ असे कॅप्शन लिहिले होते. एलीची ही पोस्ट हार्दिकला टोमणा असल्याचा अर्थ त्यावेळी काढला गेला होता. याची बरीच चर्चा झाली होती. अर्थात त्यावेळी एली यावर काहीही बोलली नव्हती. पण आता सहा महिन्यानंतर तिने यावर खुलासा केला आहे.

‘नव्या वर्षानंतर तीन दिवसांनी मी जी पोस्ट शेअर केली होती, तिचा हार्दिकशी काहीही संबध नव्हता. लोकांनी याचा संबंध जोडलेला पाहून मला स्वत:ला आश्चर्य वाटले होते. मला हार्दिकला काही सांगायचे, बोलायचे तर मी थेट त्याला मॅसेज करू शकते. त्यासाठी मला इन्स्टाग्रामची गरज नाही. मी नताशा व हार्दिकसाठी आनंदी आहे,’ असे एलीने म्हटले आहे.अभिनेत्री एली अवराम चित्रपटात येण्याअगोदर ‘बिग बॉस’च्या सीजन-७ मध्ये सहभागी झाली होती. बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर तिला ‘मिकी वायरस’ या चित्रपटाची आॅफर मिळाली. पुढे ती ‘किस किस को प्यार करू’, ‘नाम शबाना’ अशा अनेक चित्रपटात झळकली.   

टॅग्स :एली अवरामहार्दिक पांड्या