Join us

#HappyBirthdaySonamKapoor: तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण सोनम कपूरने हॉटेलमध्ये केले आहे वेटरचे काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2018 16:50 IST

सोनम कपूरचा वीरे दे वेडिंग हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. सोनमने खूपच कमी वेळात आज ...

सोनम कपूरचा वीरे दे वेडिंग हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. सोनमने खूपच कमी वेळात आज बॉलिवूडमध्ये तिचे एक स्थान निर्माण केले आहे. नीरजा, प्रेम रतन धन पायो, देल्ही ६, पॅडमॅन यांसारखे अनेक हिट चित्रपट तिने दिले आहेत. नीरजा या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे तर प्रचंड कौतुक करण्यात आले होते. या चित्रपटातील तिच्या भूमिकेची केवळ प्रेक्षकांनी नव्हे तर समीक्षकांनी देखील स्तुती केली होती. या चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.सोनम कपूरचा आज वाढदिवस आहे आणि यंदाचा तिचा वाढदिवस तिच्यासाठी खूपच स्पेशल आहे. कारण तिचे नुकतेच आनंद आहुजासोबत लग्न झाले असून लग्नानंतरचा हा तिचा पहिला वाढदिवस आहे. ती सध्या लंडनमध्ये तिच्या बहिणीसोबत आणि करिना कपूर खान सोबत आहे. सोनमला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आनंदने तिचा एक खूपच छान फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सोनम कपूर ही प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूरची मुलगी आहे. वडील प्रसिद्ध अभिनेता असल्याने मुलीसाठी चित्रपटसृष्टीत येणे हे अतिशय सोपे होते. पण सोनमला स्ट्रगलची किंमत कळावी असे अनिल आणि त्याच्या पत्नीला नेहमीच वाटत होते. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण सोनमने पॉकेट मनीसाठी वेटर म्हणून देखील काम केले आहे. तिने कॉलेज जीवनात हे काम केले होते.सोनमच्या आज फॅशन सेन्सचे प्रचंड कौतुक केले जाते. पण एकेकाळी तिचे वजन हे खूप होते. सावरिया या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री करण्यासाठी सोनमने कमीतकमी ३० किलो वजन कमी केले. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी तिने ब्लॅक या चित्रपटासाठी संजय लीला भन्सालीला असिस्ट केले आहे. सोनम एक चांगली अभिनेत्री होऊ शकते याची खात्री संजय लीला भन्सालीला असल्याने सावरिया या चित्रपटात काम करण्यासाठी त्याने तिला अनेकवेळा विचारले होते. पण काही केल्या ती अभिनयक्षेत्रात यायला तयार नव्हती. अखेर दीड वर्षांनंतर तिने चित्रपटात काम करण्यास होकार दिला. Also Read : लग्नानंतर सोनम कपूर सुरू करणार नवी इनिंग, वाचा सविस्तर!!