Join us
Daily Top 2Weekly Top 5

​ ‘हे’ स्टार किड्स साजरी करताहेत पहिली होळी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2017 13:53 IST

बॉलिवूडची होळी यंदा खास असणार आहे आणि असणार का नाही? अनेक बॉलिवूड स्टार किड्स यंदा पहिल्यांदा होळी साजरी करताहेत. ...

बॉलिवूडची होळी यंदा खास असणार आहे आणि असणार का नाही? अनेक बॉलिवूड स्टार किड्स यंदा पहिल्यांदा होळी साजरी करताहेत. म्हणजेच ही त्यांची पहिली होळी आहे. त्यांच्या मम्मी-पापांसाठीही ही होळी खास असणार आहे. यात अलीकडे बाप झालेला दिग्दर्शक व निर्माता करण जोहर, गोंडस तैमूरची ग्लॅमरस मम्मा करिना कपूर, मीशाचा लाडका बाबा शाहिद कपूर आदींचा समावेश आहे.करण जोहरची जुळी मुलंकरण जोहर अलीकडे सरोगसीच्या मदतीने दोन जुळ्या मुलांचा बाप झाला. त्याने त्याच्या मुलांचे नाव रूही आणि यश असे ठेवले आहे. रूही आणि यश या दोघांची यंदाची होळी पहिली होळी आहे. दोन दिवसांपूर्वी करणने यश व रूहीची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली होती.सैफ- करिनाचा तैमूरसैफ अली खान आणि बेगम करिना कपूर खान यांचा लाडका तैमूर याचीही ही पहिली होळी आहे. २० डिसेंबर २०१६ रोजी तैमूरचा जन्म झाला.शाहिद कपूर-मीरा राजपूतची मीशाबॉलिवूडचा राजकुमार म्हणजेच शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांची राजकन्या मीशा हिचीही यंदाची पहिली होळी आहे. २६ आॅगस्ट २०१६ रोजी मीशाचा जन्म झाला.हरभजन आणि गीताची तान्हुलीक्रिकेटपटू हरभजन सिंह आणि बॉलिवूड अभिनेत्री गीता बसरा या दोघांची चिमुकली यंदा पहिली होळी साजरी करते आहे. गतवर्षी २७ जुलैला तिचा जन्म झाला होता.जेनेलिया आणि रितेश देशमुख यांचा दुसरा मुलगाअभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया गतवर्षी दुसºयांदा मम्मी-पप्पा झालेत. १ जूनला जन्मलेल्या या मुलाचे नाव रितेश व जेनेलियाने राहिल असे ठेवले आहे. राहिलची ही पहिली होळी आहे.तुषार कपूरतुषार कपूर यंदा सरोगसीच्या माध्यमातून सिंगल पॅरेन्ट झाला. तुषारने आपल्या मुलाचे नाव लक्ष्य असे ठेवले आहे. लक्ष्यची पण ही पहिली होळी आहे.