Join us

‘हॅपी भाग जायेगी’चा ट्रेलर आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2016 21:46 IST

‘हॅपी भाग जायेगी’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर आला. हास्य विनोदाने रंगलेला हा ट्रेलर म्हणजे निश्चितपणे निखळ आनंददायी म्हणता येईल. ...

‘हॅपी भाग जायेगी’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर आला. हास्य विनोदाने रंगलेला हा ट्रेलर म्हणजे निश्चितपणे निखळ आनंददायी म्हणता येईल. भारत-पाक सीमेवरची ही हलकीफुलकी लव्ह स्टोरी आहे. जिमी शेरगिलशी लग्न न करण्याच्या इराद्याने हॅपी पंजाबामधून पळते आणि पाकिस्तानात अभय देओल याच्यापाशी येऊन तिचा शोध संपतो. घरी परतते तेव्हा तिचा आणखी एक प्रेमी म्हणजे अली फजल तिची प्रतीक्षा करीत असतो पण हॅपी काही वेगळेच ठरवून आलेली असते.  हा ट्रेलर पाहताना काहीतरी वेगळे वाटते. तुम्हीही बघा अन् मग ठरवा.}}}}