Join us

धर्मेंद्र यांच्या प्रचंड संतापल्या होत्या तनुजा अन्..., जाणून घ्या काय होता तो किस्सा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 08:00 IST

तनुजा त्यांच्या बिनधास्त अ‍ॅक्टिंगसाठी जशा ओळखल्या जात, तसाच त्यांचा स्वभावही बिनधास्त होता. एकदा तनुजा धर्मेंद्र यांच्या प्रचंड संतापल्या होत्या.

70च्या दशकातील बॉलिवूड अभिनेत्री तनुजा (Tanuja) त्यांच्या काळातील सर्वोत्कृष्ट कलाकारांपैकी एक आहेत. तनुजा यांचा आज वाढदिवस. अभिनेत्री काजोलची आई अशीही त्यांची एक ओळख. तनुजाच्या आई शोभना समर्थ एक दिग्गज अभिनेत्री होत्या. साहजिकच आईकडूनच तनुजा यांना अभिनयाचा वारसा मिळाला. आईनेच तनुजा यांना लॉन्च केले.  1950 मध्ये बालकलाकार म्हणून फिल्मी करिअर सुरु केल्यानंतर 1960 मध्ये ‘छबीली’ या चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही. त्यांना खरे यश मिळाले ते 1961 मध्ये प्रदर्शित ‘हमारी याद आएगी’ या चित्रपटाद्वारे.

 तनुजा त्यांच्या बिनधास्त अ‍ॅक्टिंगसाठी जशा ओळखल्या जात, तसाच त्यांचा स्वभावही बिनधास्त होता. एकदा तनुजा धर्मेंद्र यांच्या प्रचंड संतापल्या होत्या. त्यांनी  धर्मेंद्र यांच्या कानाखाली मारले होते.

होय तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल पण हा किस्सा घडला आहे. स्वत: तनुजा यांनी हा किस्सा सांगितला असून धर्मेंद्र यांनी त्यांच्यासोबत फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केल्याने हा प्रकार घडला होता. 'चॉंद और सूरज' सिनेमाच्या शूटिंग दरम्यान हे घडलं होतं. तेव्हा तनुजा धर्मेंद्र यांच्या पत्नीसोबत पार्टी करत होत्या. 

धर्मेंद्र यांनी नेमकं काय केलं?तनुजा म्हणाल्या, 'धर्मेंद्र यांनी माझ्यासोबत फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला. मी शॉक होऊन त्यांना निर्लज्ज असं म्हणलं होतं. इतकंच नाही तर मी त्यांच्या कानाखालीही मारलं. मी त्यांची पत्नी प्रकाश कौरला ओळखत होते. तरी धर्मेंद्र यांनी असा प्रयत्न केला. नंतर त्यांना आपल्या वागण्यावर पश्चात्ताप झाला. ते मला तनु, मेरी मॉं, सॉरी. प्लीज मला तुझा भाऊ बनव असं म्हणाले. यानंतर मी एक काळा धागा त्यांच्या हातावर बांधला होता.'

या घटनेवेळी धर्मेंद्र यांच्या आयुष्यात हेमा मालिनी यांची एंट्री झाली नव्हती. धर्मेंद्र आणि तनुजा यांनी 'चॉंद और सूरज','मोहब्बत की कसम','बहारे फिर भी आएंगी', 'दो चोर और इज्जत' यांसारख्या सिनेमात काम केले आहे. त्यांची केमिस्ट्रीही हिट झाली होती. मात्र नंतर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची रिल आणि रिअल लाईफ जोडी सुपरहिट झाली.

टॅग्स :सेलिब्रिटीधमेंद्र