Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहरूख खानला करिनाने दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, फोटो शेअर करत म्हणाली - एक असा सुपरस्टार....

By अमित इंगोले | Updated: November 2, 2020 15:18 IST

करिनाने हा फोटो शेअर करत लिहिले की, सर्वात दयाळू आणि आनंदी स्वभावाचा सुपरस्टार. शाहरूख खानचा करिनाने शेअर केलेला हा फोटो व्हायरल झाला आहे. 

बॉलिवूडचा किंग म्हणजे शाहरूख खान आज त्याचा ५५वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याला वेगवेगळ्या सेलिब्रिटी आणि फॅन्सकडून वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा मिळत आहेत. अभिनेत्री करिना कपूरनेही शाहरूख खानला फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. करिनाने दोघांचा 'मरजानी' गाण्यातील फोटो शेअर केला. करिनाने हा फोटो शेअर करत लिहिले की, सर्वात दयाळू आणि आनंदी स्वभावाचा सुपरस्टार. शाहरूख खानचा करिनाने शेअर केलेला हा फोटो व्हायरल झाला आहे. 

शाहरूख खानला ५५व्या वाढदिवसानिमित्त भरपूर शुभेच्छा देत करिनाने पोस्टमध्ये लिहिले की, 'हॅपी बर्थडे किंग खान. चला नेहमीसारखा मस्ती-मस्तीत डान्स करू. एका असा सुपरस्टार जो जास्त दयाळू आणि मोठ्या मनाचा आहे. नेहमी पुढे जात रहा'. करिना कपूरच्या या पोस्टवर सोशल मीडिया यूजर्स भरभरून कमेंट करत आहेत. ते शाहरूख खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. तसेच त्याचे फॅन्स त्याच्या वाढदिवसानिमित्त इतके आनंदी आहेत की, सोशल मीडियावर  #HappyBirthdaySRK ट्रेन्ड करत आहे. (Happy Birthday SRK: जेव्हा गॅंगस्टर अबू सालेमला शाहरूख खानने दिला होता दणका..)

शाहरूख खानला बर्थडे आधीच त्याच्या बर्थडे प्लॅनबाबत विचारले होते. यावर किंग खानने उत्तर दिलं होतं की, यावेळी दुरूनच प्रेम दाखवण योग्य असेल. तसेच शाहरूखने कोरोनामुळेही फॅन्सना मन्नतबाहेर न येण्याचं आवाहन केलं होतं. (शाहरूख खानला त्याच्या आयकॉनिक स्टाइलची वाटते सर्वात जास्त भीती, जाणून घ्या कारण...)

दरम्यान, शाहरूख खान शेवटचा झिरो सिनेमात दिसला होता. यात तो कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मासोबत दिसला होता. पण हा सिनेमा फार काही कमाल दाखवू शकला नव्हता. त्याचे फॅन्स त्याच्या नव्या सिनेमाची आतुरतेने वाट बघत आहे. अशी चर्चा आहे की, लवकरच शाहरूख खान त्याच्या नव्या सिनेमाची घोषणा करेल. 

टॅग्स :करिना कपूरशाहरुख खानबॉलिवूड