Join us  

Birthday Special : दीपिकाआधी या अभिनेत्रींसोबत होतं रणवीरचं अफेअर!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2018 10:34 AM

सध्या तो अभिनेत्री दीपिका पादुकोनसोबत सिरिअस रिलेशनशिपमध्ये जरी असला तरी त्याचे तिच्या आधीही काही अभिनेत्रींसोबत अफेअर्स होते. 

बॉलिवूडचा सध्याचा सर्वात हॉट अभिनेता रणवीर सिंह आता लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. बॉलिवूड कलाकारांचे अफेअर्स नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. या रणबीर सिंह सुद्धा कधी मागे राहिला नाही. सध्या तो अभिनेत्री दीपिका पादुकोनसोबत सिरिअस रिलेशनशिपमध्ये जरी असला तरी त्याचे तिच्या आधीही काही अभिनेत्रींसोबत अफेअर्स होते. पण या अफेअर्सबाबत त्याने कधीही जाहीरपणे वक्तव्य केलं नाही. मात्र, चर्चा नक्कीच झाली होती. 

1) अहाना देओल

रणवीर सिंहचे अफेअर्स  नेहमीच चर्चेत होते. असे सांगितले जाते की, मुंबईत असताना कॉलेजच्या दिवसात तो अहाना देओलसोबत डेट करत होता. पण पुढच्या शिक्षणासाठी रणवीर परदेशात गेला आणि त्यांचं नातं तिथेच संपलं. पण दोघांनीही या त्यांच्या नात्यावर कधीही काहीही वक्तव्य केलं नाही. 

 2) अनुष्का शर्मा

'बॅन्ड बाजा बारात' या आपल्या सिनेमात रणवीर आणि अनुष्का पहिल्यांदाच एकत्र आले होते. त्यावेळी दोघांच्या अफेअरची चांगलीच चर्चा रंगली होती. अनेकदा दोघांना एकत्र बघण्यातही आलं होतं. बराचकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांचं ब्रेकअप झालं. त्यानंतरही काही सिनेमांमध्ये ते एकत्र दिसले. 

3) सोनाक्षी सिन्हा

2013 मध्ये आलेल्या 'लुटेरे' या सिनेमावेळी रणवीर आणि सोनाक्षीच्या अफेअरची चांगलीच चर्चा झाली होती. पण या रणवीरने त्यांच्यात अफेअर असल्याचं नाकारलं होतं. आम्ही केवळ चांगले मित्र आहोत असे सांगितले होते. पण तरीही बॉलिवूडमध्ये त्यांच्याबाबत कुजबूज सुरु होती. 

4) दीपिका पादुकोन

रणवीर सिंह आणि दीपिकाचं प्रेम हे खुल्लमखुल्ला आहे. कधी रणवीरने तर कधी दीपिकाने त्यांच्या अफेअरबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिली. दोघेही अनेक वर्षांपासून एकत्र आहेत. आता दोघेही इतके प्रेमात आहेत की, दोघे लवकरच लग्न करणार आहेत. 

टॅग्स :रणवीर सिंगबॉलिवूडदीपिका पादुकोणअनुष्का शर्मासोनाक्षी सिन्हा