Join us
Daily Top 2Weekly Top 5

Happy birthday, Prabhas! बर्थडे बॉय प्रभासबद्दलच्या ‘या’ गोष्टी तुम्ही जाणता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 08:54 IST

‘बाहुबली: द बिगनिंग’ आणि ’बाहुबली: द कन्क्लुजन’ या दोन चित्रपटांमुळे  लोकप्रियतेचे अत्त्युच्च शिखर गाठणारा अभिनेता प्रभास याचा आज (२३ आॅक्टोबर) वाढदिवस.

प्रभास आणि फक्त प्रभास. एस.एस.राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली: द बिगनिंग’ आणि ’बाहुबली: द कन्क्लुजन’ या दोन चित्रपटांमुळे  लोकप्रियतेचे अत्त्युच्च शिखर गाठणारा अभिनेता प्रभास याचा आज (२३ आॅक्टोबर) वाढदिवस. आज प्रभासचे देशातचं नाहीत तर जगभर चाहते आहेत. साहजिकचं, प्रभासबद्दलची बित्तंमबातमी जाणून घेण्यास चाहते उत्सूक आहेत. प्रभासबद्दलच्या अशाच काही गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

होय, चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेला प्रभास सुमारे १८० कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. 

 प्रभास हे त्याचे खरे नाव नाही.‘बाहुबली’ प्रभासचे खरे नाव वेंकट सत्यनारायण प्रभास राजू उप्पलपट्टी आहे. प्रभासची कौटुंबिक पार्श्वभूमी सिनेमाची आहे. त्याचे वडील सूर्यनारायण राजू निमार्ते आहेत. तर काका उप्नापती कृष्णम राजू टॉलिवूड स्टार आहेत.

अमरेंद्र आणि महेंद्र बाहुबलीची भूमिका साकारणारा प्रभास ख-या आयुष्यात इंजिनीअर आहे. त्याने हैदराबादच्या श्री चैतन्य कॉलेजमधून बीटेक केले आहे. पण   प्रभासला हॉटेल इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचे होते. म्हणजेच प्रभास आहे इंजिनिअर, त्याला करिअर करायचे होते हॉटेल इंडस्ट्रीत अन् तो झाला अभिनेता. एका मुलाखतीत त्याने हा खुलासा केला होता. 

प्रभासने 2002 मध्ये प्रदर्शित झालेला ‘ईश्वर’ या तेलुगु सिनेमातून आपल्या सिने कारकिर्दीची सुरुवात केली आहे. अनेक जण प्रभासच्या बॉलिवूड डेब्यूकडे डोळे लावून बसले आहेत. पण प्रभासने एका हिंदी चित्रपटातही काम केले आहे, हे क्वचितचं जणांना माहित असेल.  होय, अजय देवगणच्या ‘अ‍ॅक्शन जॅक्सन’मधील एका गाण्यात तो दिसला होता. 

प्रभास दाक्षिणात्य सिनेसृष्टीमधील पहिला कलाकार आहे, ज्याचा मेणाचा पुतळा बँकॉकमधील मादाम तुसाँ म्युझियममध्ये आहे. हा पुतळा अमरेंद्र बाहुबलीच्या रुपातील आहे.

आपल्या 14 वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत प्रभासने केवळ 19-20 चित्रपट केले आहेत. बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमीर खानप्रमाणेच प्रभासही वर्षाला एकच चित्रपट करतो. प्रभास राजकुमार हिरानींचा मोठा चाहता आहे. त्याने ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि ‘3 इडियट्स’ 20 हे चित्रपट वेळा पाहिले आहेत.अख्ख जग प्रभासचे चाहते असताना, बॉलिवूडमधील शाहरुख आणि सलमान त्याचे हे आवडते कलाकार आहेत. तर हॉलिवूडमधील रॉबर्ट डिनीरो यांचा तो मोठा फॅन आहे.

प्रभासने अजून लग्न केलेले नाही. आतापर्यंत त्याने 6000 लग्नाचे प्रस्ताव धुडकावले आहेत.

बाहुबली सिनेमासाठी बलदंड शरीर कमावण्यासाठी प्रभासने घरातच व्हॉलीबॉल कोर्ट बनवले होते, जेणेकरुन तो कधीही वर्कआऊट करु शकतो आणि आवडता खेळही एन्जॉय करु शकतो.बाहुबलीसाठी प्रभासने 30 किलो वजन वाढवलं होतं. चार वर्ष हा लूक कायम ठेवणं त्याच्यासाठी मोठं आव्हान होतं. या चार वर्षांत त्याने प्रचंड चिकन आणि अंडी खाल्ली होती. 

टॅग्स :प्रभास