Join us
Daily Top 2Weekly Top 5

Happy Birthday: महेश भट यांच्याकडून लेकीला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा,चिमुकल्या आलियाचा अंदाज पाहून तुम्हीही म्हणाल सो क्यूट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 12:55 IST

आपल्या लाडक्या अभिनेत्रीवर सोशल मीडियावर चाहत्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर आलियाला दिलेल्या एका खास वाढदिवसाच्या शुभेच्छांची चर्चा सुरू आहे.

अभिनेत्री आलिया भट... अगदी कमी वयातच जिने आपल्या अभिनयाने चित्रपटरसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलं आहे. प्रत्येक चित्रपटात वेगळी भूमिका साकारत आलियाने आपल्यातील अभिनयकौशल्य दाखवून दिले आहे. 2 स्टेट्स, हम्प्टी शर्मा की दुल्हनिया, उडता पंजाब, हायवे, डिअर जिंदगी, बद्रीनाथ की दुल्हनिया, राजी ते काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला गलीबॉय चित्रपटात आलियाने विविधरंगी भूमिका साकारल्या आहेत. या भूमिकांमुळे आलियाची चित्रपटसृष्टीतील आघाडीची नायिक म्हणून गणना होते. 15 मार्च हा आलियाचा वाढदिवस. त्यामुळे तिचा वाढदिवस म्हणजे तिच्या चाहत्यांसाठी खास दिवस. त्यामुळे आपल्या लाडक्या अभिनेत्रीवर सोशल मीडियावर चाहत्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर आलियाला दिलेल्या एका खास वाढदिवसाच्या शुभेच्छांची चर्चा सुरू आहे.

प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक आणि आलियाचे वडील महेश भट यांनी आलियाला दिलेल्या खास शुभेच्छांची सध्या चर्चा सुरू आहे. महेश भट यांनी लेकीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या बालपणीचा एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. यांत चिमुकली आलिया पाहायला मिळतेय. यांत लहानग्या आलियाचा क्युट अंदाज कुणालाही दिसतोय. चिमुकली आलिया वडिलांच्या म्हणजेच महेश भट यांच्या पोटावर बसली आहे. या व्हिडिओमध्ये महेश भट यांच्या हातात मोबाईल असून ते हॅपी बर्थडे टू यू असे गुणगुणत असल्याचे ऐकायला मिळत आहे. हा व्हिडिओ शेअर करत असताना महेश भट यांनी या व्हिडिओला कॅप्शनही दिली आहे. काळ बदलला तरी काही आठवणी मनात तशाच असतात असं कॅप्शन देत महेश भट यांनी लाडक्या लेकीला 26व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडिओला सोशल मीडियावर बरेच लाइक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. तसंच हा व्हिडिओ व्हायरल होतोय.    

टॅग्स :आलिया भटमहेश भट