Join us
Daily Top 2Weekly Top 5

Happy Birthday Kareena: असा साजरा झाला करिना कपूरचा बर्थ डे! पाहा, मिडनाईट पार्टीचे फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2018 11:36 IST

बेगम करिना कपूर खान हिचा आज (२१ सप्टेंबर) वाढदिवस. काल रात्री १२ च्या ठोक्याला बेबोने कुुटुंबासोबत वाढदिवस साजरा केला.

बेगम करिना कपूर खान हिचा आज (२१ सप्टेंबर)वाढदिवस. काल रात्री १२ च्या ठोक्याला बेबोने कुुटुंबासोबत वाढदिवस साजरा केला. या पार्टीत करिनाचा पती नवाब सैफ अली खान, नणंद सोहा अली खान, तिचा पती कुणाल खेमू, बहीण करिश्मा कपूर, आई बबीता, पापा रणधीर कपूर, कुणाल कपूर, समायरा असे सगळे जण धम्माल मस्ती करताना दिसले. 

मध्यरात्री रंगलेल्या या पार्टीचे फोटो तूर्तास सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

करिनाच्या बर्थ डे पार्टीतील सगळयात लक्षवेधी गोष्ट होती, ती म्हणजे केक. होय, बेबो, तू आमची रॉकस्टार आहेस, असे या केकवर लिहिले होते. शिवाय केकवर ब्लॅक ड्रेसमध्ये हातात वाईनचा ग्लास घेतलेल्या बेबोची प्रतिकृतीही होती. 

पार्टीतील सगळे लोक कॅज्युअल ड्रेसमध्ये होते. बर्थ डे गर्ल करिनाने व्हाईट प्रिंटेड टीशर्ट आणि डेनिम जीन्स कॅरी केला होता.

करिश्माने या पार्टीचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आई बबीतासोबत, पापा रणधीर कपूरसोबत आणि हबी सैफ अली खानसोबत करिना प्रचंड आनंदी दिसली.

सर्वांनी खास अंदाजात बुमेरांग व्हिडिओ बनवून बेबोला विश केले.

टॅग्स :करिना कपूरसैफ अली खान करिश्मा कपूर