Join us
Daily Top 2Weekly Top 5

Happy Birthday Jr bachchan: अमिताभ यांच्या अभिषेक बच्चनला आगळ्या-वेगळ्या शुभेच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2017 11:45 IST

अभिनेता अभिषेक बच्चन आज (५ फेबु्रवारी) ४१ वर्षांचा झाला. आज वाढदिवसानिमित्त अभिषेकचे पिता अर्थात महानायक अमिताभ बच्चन यांनी त्याला ...

अभिनेता अभिषेक बच्चन आज (५ फेबु्रवारी) ४१ वर्षांचा झाला. आज वाढदिवसानिमित्त अभिषेकचे पिता अर्थात महानायक अमिताभ बच्चन यांनी त्याला आगळ्या वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा दिल्यात. अमिताभ यांनी फेसबुकवर स्वत:चे व अभिषेकचे दोन फोटो शेअर करीत अभिषेकला विश केले. एका पोस्टमध्ये अमिताभ यांनी लिहिले, ‘ट्रेंडिंग नंबर १, हॅपी बर्थ डे सन’.अमिताभ यांनी ‘बंटी और बबली’ या चित्रपटातील एक फोटोही शेअर केला आहे. यात ते अभिषेकसोबत डान्स करताना दिसत आहेत. याशिवाय एका फोटोत दोघे एकत्र प्रवास करताना दिसत आहेत.या पिता-पुत्राच्या या विंटेज फोटोंना सात तासात सुमारे साडे तीनशे लोकांनी शेअर केलेत. टिष्ट्वटरवरही अनेक लोकांनी अमिताभ व अभिषेक या दोघांनाही यानिमित्त शुभेच्छा दिल्यात. शिवाय दोघांचे काही फोटोही शेअर केलेत. बिग बींनी या फोटोंना रिटष्ट्वीटही केले. असाच एक फोटो आशा बच्चन यांनीही शेअर केला.शिव एबी या टिष्ट्वटर हँडलवरून शेअर करण्यात आलेल्या एका फोटोत अमिताभ बच्चन नवजात अभिषेकचा लाड करताना दिसत आहेत. अभिषेक बच्चन याचे फिल्मी करिअर फार से समाधानकारक नाही. यामुळे अभिषेक अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलिंगचा बळी  ठरला. पण बच्चन फॅमिलीने कायम अभिषेकला पाठींबा दिला.   अभिषेकने २००० सालच्या ‘रेफ्युजी’ या चित्रपटामधून आपल्या अभिनय कारकिदीर्ची सुरूवात केली.  त्याच्या नावे तीन फिल्मफेअर पुरस्कारासह एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहे.माजी मिस वर्ल्ड विजेती व बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या राय ही अभिषेक बच्चनची पत्नी आहे. त्यांच्या जोडीला सिने-जगतात ‘अभिवर्या’ या टोपणनावाने ओळखले जाते.