Join us

एकेकाळी लहानशा घरात राहणारा 'हा' अभिनेता आहे आज आमिर खानचा शेजारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 13:21 IST

Pankaj tripathi: सुरुवातीच्या काळात चित्रपटांमध्ये लहान लहान भूमिका साकारणाऱ्या पंकज त्रिपाठी यांना खरी ओळख वेबसीरिजच्या माध्यमातून मिळाली.

ठळक मुद्दे२०१९ मध्ये त्यांनी मुंबईतील महागड्या अशा मड आयलंड येथे स्वत:चं हक्काचं घर खरेदी केलं आहे.

ओटीटीवर तुफान गाजलेल्या 'सिक्रेड गेम्स' या वेब सीरिजमधील कालीन भैय्याला विसरणं या जन्मात तरी अनेकांना शक्य नाही. अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी साकारलेली ही भूमिका सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय झाली. त्यामुळे आजही अनेक जण पंकज यांना कालीन भैय्या याच नावाने ओळखतात. विशेष म्हणजे, या भूमिकेच्या माध्यमातून पंकज त्रिपाठी यांनी त्यांच्या अभिनयाची एक नवी बाजू प्रेक्षकांसमोर सादर केली. म्हणूनच, आज त्यांची लोकप्रियता अफाट आहे. पंकज त्रिपाठी यांच्या प्रोफेशनल लाइफविषयी सारेच जण ठावूक आहेत. मात्र, त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये आलेले चढउतार फार मोजक्या जणांनाच माहित आहेत. विशेष म्हणजे एकेकाळी लहानशा घरात राहणारा हा कलाकार आज आमिर खानच्या शेजारी राहतोय.

५ सप्टेंबर १९५७ मध्ये बिहारच्या गोपालगंज येथे एका शेतकरी कुटुंबात पंकज त्रिपाठी यांचा जन्म झाला. एका लहानशा गावातून आणि मध्यमवर्गीय कुटुंबात आलेल्या त्रिपाठी यांना कलाविश्वात हक्काचं स्थान निर्माण करताना अनेक संकट, अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांची मन जिंकली.  सुरुवातीच्या काळात चित्रपटांमध्ये लहान लहान भूमिका साकारणाऱ्या पंकज त्रिपाठी यांना खरी ओळख वेबसीरिजच्या माध्यमातून मिळाली.

करिअरच्या सुरुवातीच्या काळात पंकज त्रिपाठी मुंबईत एका लहानशा घरात राहत होते. मात्र, २०१९ मध्ये त्यांनी मुंबईतील महागड्या अशा मड आयलंड येथे स्वत:चं हक्काचं घर खरेदी केलं आहे. विशेष म्हणजे त्यांच्या शेजारी आमिर खान, जॅकी श्रॉफ, गोविंदा असे दिग्गज कलाकार राहतात.

थलायवी : चित्रपट प्रदर्शनावर मल्टीप्लेक्सेसने घेतला महत्त्वाचा निर्णयदरम्यान, पंकज त्रिपाठी यांनी 'सिक्रेड गेम्स', 'मिर्झापूर','क्रिमिनल जस्टिस' अशा गाजलेल्या वेबसीरिजमध्ये काम केलं आहे.