Join us
Daily Top 2Weekly Top 5

Happy Birthday Aishwarya : पाहा, बर्थडे गर्ल ऐश्वर्या राय बच्चनचे unseen फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 09:51 IST

सौंदयार्ची खाण म्हणजे ऐश्वर्या राय. बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय बच्चन हिचा आज (१ नोव्हेंबर) वाढदिवस.

सौंदयार्ची खाण म्हणजे ऐश्वर्या राय. बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय बच्चन हिचा आज (१ नोव्हेंबर) वाढदिवस. ऐश्वर्या म्हणजे  दाक्षिणात्य कुटुंबात जन्मलेली ऐश्वर्या मूळची मल्याळम. पण तिचा जन्म कर्नाटकातील मंगळूरचा. ऐश्वर्याच्या जन्मानंतर राय कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. ऐश्वर्यार्चे अख्खे बालपण मुंबईत गेले आणि याच मुंबईत राहून ऐश्वर्याने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. अगदी जगतसुंदरीचा किताब जिंकण्यापासून तर बॉलिवूड, हॉलिवूडची अभिनेत्री म्हणून मिरवण्यापर्यंत आणि कान्स चित्रपट महोत्सवात मिरवण्यापासून तर टाईम्सच्या मुखपृष्ठावर झळकण्यापर्यंतचा ऐश्वयार्चा प्रवास डोळे दिपवून टाकणारा आहे. आज  वाढदिवसानिमित्त  बर्थ डे गर्ल ऐश्वर्याचे काही खास फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

 ऐश्वयार्ची आई वृंदा राय या लेखिका आहेत आणि वडील कृष्णराज चक्क समुद्र जीवशास्त्रज्ञ होते. ऐश्वर्याच्या वडिलांचे निधन झाले. तिचा धाकटा भाऊ मर्चंट नेव्हीत आहे. 

ऐश्वर्याने आर्किटेक्चर अभ्यासक्रमाला तिने प्रवेश घेतला. माटुंग्याच्या रूपारेल कॉलेजात तिचे शिक्षण झाले. पुढे ऐश्वर्या आपसूकच मॉडेलिंगच्या क्षेत्रात  ओढली गेली. या मॉडेलिंगच्या दुनियेत वावरत असताना मिस इंडिया स्पर्धेत तिने भाग घेतला.  पण या स्पर्धेत सुश्मिता सेन अव्वल ठरली आणि ऐश्वर्याला दुसरा क्रमांक मिळाला.

  पुढे मिस वर्ल्ड स्पर्धेत भाग घेतल्यानंतर जगतसुंदरीचा मुकूट  तिच्या डोक्यावर चढला.  मिस इंडिया, मिस वर्ल्ड या स्पर्धांनंतर बॉलिवूडमध्ये येण्याचा पायंडा तिनेही जपला आणि एका सौंदयार्ची खाण असलेल्या अभिनेत्रीचा जन्म झाला.

  मणिरत्नम यांच्या ‘इरूवर’ चित्रपटातून ऐश्वर्याच्या रूपेरी कारकीर्दीस सुरूवात झाली. बॉबी देवलसोबतचा ‘और प्यार हो गया’हा तिचा पहिला हिंदी चित्रपट. दक्षिणेतील दिग्दर्शक एस. शंकर यांचा ‘जीन्स’ या चित्रपटातून तिने बहुभाषक चित्रपटातून काम केले. तिला त्यासाठी अभिनयासाठी पुरस्कारही मिळाला.  हम दिल दे चुके सनम, मग  देवदास ,  ताल ,चोखेर बाली ,  रेनकोट , जोधा अकबर हे चित्रपट विशेष गाजले.  

मिसेस आॅफ स्पाईसेस,  ब्राईड अँड प्रिजुडाईस,  प्रोव्होक्ड,  द लास्ट लिजन  या आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्येही तिने अभिनयगुणाची छाप सोडली.   

कान्सच्या चित्रपट महोत्सवात म्हणूनच  ज्युरी  बनण्याचा मान मिळालेली ती ऐकमेव भारतीय अभिनेत्री आहे. जगप्रसिद्ध टाईम्स मॅगझिनने तिच्या कर्तृत्वाची दखल घेत आशिया खंडातील प्रभावशाली शंभर व्यक्तीमध्ये तिचा समावेश केला आहे. जगातील दहा सौंदर्यवतींमध्ये ती आहे.  

 

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चन