Join us

आराध्याने पापा अभिषेक बच्चनला दिले सरप्राइज, जाणून तुम्हीही इमोशनल व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2018 15:25 IST

शूटिंगसाठी तब्बल दोन महिने घराबाहेर असलेल्या अभिषेकला मुलगी आराध्याने एक सरप्राइज दिले, जे बघून अभिषेक चांगलाच इमोशनल झाला.

अभिनेता अभिषेक बच्चन गेल्या काही दिवसांपासून काश्मीर येथे होता. त्याठिकाणी तो निर्माता अनुराग कश्यपच्या आगामी ‘मनमर्जियां’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. नुकताच तो शूटिंगचे शेड्यूल पूर्ण करून मुंबईत परतला आहे. मात्र मुंबईत परताच त्याला एका सरप्राइजचा सामना करावा लागला. अभिषेकच्या सहा वर्षीय चिमुकल्या आराध्याने त्याच्यासाठी एक खास सरप्राइज प्लॅन केले होते. याबाबतची माहिती स्वत: अभिषेकनेच त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दिली होती. दोन महिन्यांनंतर जेव्हा अभिषेक त्याच्या आॅफिसमध्ये पोहोचला तेव्हा त्याला त्याठिकाणी हाताने लिहिलेली एक स्पेशल नोट दिसून आली. त्यावर लिहिले होते की, ‘आय लव यू पापा’ मुलीने लिहिलेली ही नोट बघून अभिषेक चांगलाच इमोशनल झाला होता. त्याने त्याचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘जेव्हा तुम्ही दोन महिन्यांनंतर आॅफिसला जाता आणि त्याठिकाणी मुलीने लिहिलेली नोट मिळते तेव्हा तुमची काय स्थिती होईल, हे शब्दात सांगणे अवघड आहे.’ यावेळी अभिषेकने हॅशटॅगच्या माध्यमातून आराध्याला जगातील सर्वांत चांगली मुलगी म्हणून संबोधले.  दरम्यान, अभिषेकच्या चाहत्यांना त्याची ही पोस्ट खूपच पसंत येत आहे. तसेच चाहत्यांकडून आराध्याचेही कौतुक केले जात आहे. महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा असलेल्या अभिषेकने २००७ मध्ये मिस वर्ल्ड आणि अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत विवाह केला होता. २०११ मध्ये आराध्याचा जन्म झाला. सध्या आराध्या सहा वर्षांची झाली असून, धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. आमिर खानचा मुलगा आजाद राव खान आणि आराध्या खूप चांगले मित्र आहेत.