प्रभासचा साहोच्या सेटवरचा 'हा' फोटो झाला व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 12:34 IST
सुजीथ रेड्डीच्या दिग्दर्शन तयार होणारा 'साहो' हा एक अॅक्शन आणि थ्रीलर चित्रपट आहे. बाहुबलीचा सुपरस्टार प्रभासची साहोच्या सेटवरचे फोटो लीक झाले आहेत.
प्रभासचा साहोच्या सेटवरचा 'हा' फोटो झाला व्हायरल!
सुजीथ रेड्डीच्या दिग्दर्शन तयार होणारा 'साहो' हा एक अॅक्शन आणि थ्रीलर चित्रपट आहे. बाहुबलीचा सुपरस्टार प्रभासची साहोच्या सेटवरचे फोटो लीक झाले आहेत. साहोच्या सेटवरचा लीक झालेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या फोटोत प्रभास बाईकवर बसलेला दिसतो आहे. मिळालेल्या माहितीनुसार दुबईमध्ये एका स्पेशल सीनचे शूटिंग दरम्यान लीक झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार प्रभास यात कोणाचा तरी पाठलाग करताना दिसणार आहे. याच बरोबर यात दुबईतले काही टॉपचे लोकेशनपण दाखवण्यात येणार आहे. जवळपास 150 कोटींचा बजेट असलेल्या साहोचे शूटिंग हैदराबाद, मुंबई, अबू धाबी, दुबई आणि रोमानियात होणार आहे. चित्रपटात प्रभास जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे. यात नील नितीन मुकेश, मंदिरा बेदी आणि जॅकी श्रॉफ व्हिलेनच्या भूमिका साकारणार आहेत. 'साहो’मध्ये श्रद्धा डबलरोल साकारताना दिसणार आहे. केवळ इतकेच नाही तर प्रभासच्या तोडीला तोड असे अॅक्शन सीन्स करतानाही ती दिसणार आहे. एमी जैक्सन, अरूण विजय आणि आदित्य श्रीवास्तव सारखे कलाकारही दिसणार आहेत. प्रभासचा हा चित्रपट तामिळ, तेलगू आणि हिंदीत तयार होत आहे. रामोजी फिल्म सिटीत ‘साहो’चे बहुतांश शूटींग झाले. सूत्रांचे खरे मानाल तर, ‘साहो’मध्ये स्वातंत्र्याचीपूर्वीची कथा आहे. चित्रपटात ब्रिटीश काळ दाखवला आहे. चित्रपटात सर्वत्र ब्रिटीश झेंडे दिसतील. मैदानावर शंभरावर घोडे दौडताना दिसतील. इतकेच नाही तर चित्रपटातील पात्र पोलो गेम खेळतानाही दिसतील. यातील पात्र राजा-महाराजांप्रमाणे रॉयल कुर्ता-पायजामा तर ब्रिटीश इंग्रज खाकी रंगाच्या युनिफॉर्ममध्ये असतील.ALSO READ : ‘बाहुबली’ प्रभास खरचं करतोय का हॉलिवूड डेब्यू? उत्तर हवे असेल तर वाचा बातमीसुपरडुपर हिट ‘बाहुबली2’नंतर अभिनेता प्रभासचा ‘साहो’ हा पहिला सिनेमा येत आहे. त्यामुळे प्रभासच्या या सिनेमाकडे सगळ्यांचे डोळे लागले आहे. ‘बाहुबली2’ने कमाईचे सगळे विक्रम मोडत प्रेक्षकांचे अपार प्रेम मिळवले होते. त्यामुळे ‘बाहुबली2’नंतर प्रभासचा हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षांवर किती खरा उतरतो, यावर सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.