Join us

चार दिवसांपासून मंदिरात वास्तव्य करीत आहे ‘हा’ गायक; मात्र लोक अनभिज्ञ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 14:48 IST

गेल्या चार दिवसांपासून बॉलिवूडचा आघाडीचा गायक सोनू निगम ऋषिकेश या तीर्थनगरीत वास्तव्य करीत आहे. परंतु लोकांना त्याची भनकही लागली नसल्याचे समोर आले आहे.

बॉलिवूडचा आघाडीचा गायक सोनू निगम सध्या तीर्थनगरी ऋषिकेश येथे आहे. याठिकाणी तो गेल्या २६ मार्चपासून आहे. मात्र तो याठिकाणी असल्याचा कोणालाच थांगपत्ता नाही. सोनू निगमने त्याच्या ऋषिकेश यात्रेदरम्यान येथील विविध धार्मिक स्थळांचे दर्शन घेतले. तसेच स्वर्गाश्रमस्थित महर्षि महेश योगी यांच्या तपस्थळी झोपडीचे भ्रमणही केले. याविषयी सोनूने सांगितले की, मी २६ मार्च रोजी तीर्थनगरीत पोहोचलो. याठिकाणी पोहचल्यानंतर सर्वात अगोदर नरेंद्रनगरस्थित सिद्धपीठ मां कुंजापुरी मंदिराचे दर्शन घेतले. त्यानंतर तपोवन क्षेत्र येथे थांबलो. यादरम्यान मी स्वर्गाश्रम येथील ध्यानयोगचे प्रणेता महर्षि महेश योगी यांच्या तपस्थळी झोपडीचे भ्रमण केले. यावेळी सोनू निगमने स्वर्गाश्रम आणि मुनिकीरेती बाजारातील अनेक दुकानांमधून खरेदीही केली. ज्यावेळी सोनू बाजारात पोहोचला तेव्हा चाहत्यांनी त्याच्यासोबत सेल्फी घेण्याचाही आनंद घेतला. यावेळी स्थानिक लोकांनी त्याला वस्त्र आणि गंगाजल भेट दिले. यावेळी नवीन चंद्रा, पंकज थपलियाल, नितीन राज आदी उपस्थित होते.