‘हा’ पाकिस्तानी गायक करणार बॉलिवूड ‘वापसी’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2017 14:25 IST
उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर बॉलिवूडमधील पाकिस्तानी कलाकारांविरूद्ध रान माजले होते. फवाद खान, माहिरा खान या पाकिस्तानी कलाकारांसह अनेक पाकी ...
‘हा’ पाकिस्तानी गायक करणार बॉलिवूड ‘वापसी’!
उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर बॉलिवूडमधील पाकिस्तानी कलाकारांविरूद्ध रान माजले होते. फवाद खान, माहिरा खान या पाकिस्तानी कलाकारांसह अनेक पाकी गायकांना भारतात परफॉर्मन्स करण्यास मनाई करण्यात आली होती. पण आता एका पाकिस्तानी गायकाने बॉलिवूडमध्ये वापसी केली आहे. होय, पाकिस्तानच्या सीमा लांघून या गायकाचा आवाज अनेक भारतीयांच्या हृदयापर्यंत पोहोचला. असंख्य भारतीय त्याच्या आवाजाचे चाहते आहेत. आम्ही बोलतोय ते आतिफ असलमबद्दल.होय, आतिफ असलम बॉलिवूडमध्ये पुन्हा वापसी करतोय. इरफान खानचा आगामी चित्रपट ‘हिंदी मीडियम’मध्ये ‘हूर’ नामक गाण्याला आतिफ आपला आवाज देणार आहे. सचिन - जिगरने हे गाणे कम्पोज केले आहे. या चित्रपटात आतिफशिवाय पाकिस्तानी अभिनेत्री सबा कामर हिचीही मुख्य भूमिका आहे.आतिफने या गाण्याचे रफ स्केच गत महिन्यात जॉर्जिया येथे ऐकले होते. तेव्हापासून त्याला हे गाणे गायचे होते. अखेर त्याला ही संधी मिळालीच. याबद्दल आतिफ सांगतो की, बॉलिवूडने मला कायम प्रेम दिले आहे. भारतीयांना माझी गाणी आवडतात. हे गाणे सुद्धा त्यांना आवडेल, अशी आशा करतो. मी ‘हिंदी मीडियम’चे निर्माते दिनेश विजन यांच्यासोबत २०१५ मध्ये ‘बदलापूर’ या चित्रपटात काम केले होते. तो एक अविस्मरणीय अनुभव होता.‘हिंदी मीडियम’ या चित्रपटात दिल्लीच्या चांदनी चौक येथे राहणाºया एका मध्यमवर्गीय कुटुंबाची कथा दाखविली जाणार आहे. इरफान आणि सबा एका मुलीचे आई-वडिल असल्याचे यात दाखवले आहे. त्यांना एका बड्या शाळेत आपल्या मुलीचे अॅडमिशन करायचे असते. पण एका बड्या इंग्लिश मीडियम शाळेत अॅडमिशनसाठी काय काय दिव्यातून जावे लागते, हे या चित्रपटाचे कथानक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन साकेत चौधरी याने केले आहे.